पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/105

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 माझ्या व्यक्तिगत जीवनात मला फार कमी भोगायला मिळालं. तुलनेने भौतिक कसोटीवर; पण आसपासच्या समाजाने कळत नकळत साध्या साध्या कारणांनी मला माझ्या अनाथपणाची सतत जाणीव बोचणी दिली. कुशनवर बसलेय खरी; पण खिळा सतत बोचतोय. काढायचा तर कुशनच पूर्णपणे उसवायला हवं; पण आज तरी माझ्या मनाची तशी तयारी नाही. ती बोच हीच माझ्या जीवनाची रंगत आहे. त्याशिवाय जीवन ते कसले? डाग नाही तर चंद्राची गंमत ती काय?


दुःखहरण/१०४