पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ " जर कुणाप्रत आश्रय दे स्वतां ॥ तर कधीं उदधीपरि आश्रिता ॥ ॥ लपवित न, तया जनिं निर्भय ॥ उघड वागवि रक्षुनि अक्षय ॥ १०४ ॥ ॥ तनु परोपकृतींत जरी सदा ॥ झिजवि चंदनतुल्य, तरी कदा ॥ ॥ खलसमागम त्यास नसे जरा ॥ जणु सुवर्णसुयुक्त खुले हिरा ।। १०५ ॥ ॥ पिकगणाप्रत आम्रतरू जसा ॥ गुणिजनाप्रत आश्रय दे तसा ॥ ॥ मधुर आम्रफलापरि फारसें ॥ मन असे परिपूर्ण दयारसें ॥ १०६ ॥ ॥ नयपथा त्यजुनी भलतीकडे ॥ कधिंहि टाकियर्णे पद वाकर्डे ॥ ॥ धरियणें तरवाखिरीच तें || मनिं असे समजे चिर सूज्ञतें ॥ १०७ ॥ ॥ जणु रविच असा हा ख्यात मल्हारराव ।। ॥ जनबहुसुखदात्री चंद्रिका ती अपूर्व ॥ ॥ त्वरित उदित भारी रम्य होणार आतां ॥ ॥ समर्थिच झणुनी की पावला काय अस्ता १०८ ॥ ॥ भाग नववा समाप्त ॥ ॥ मल्हारराव होळकर याजवरलि काव्य ॥ ॥ सर्व समाप्त ॥