पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ ॥ त्यांस होळकरवर्य बोलला ॥ " होय शेवट मदीय चांगला ॥ ॥ पुत्र आज असता जरी, तरी ॥ ह्यास होति न कधीं बरोबरी । । ९२॥ ॥ एक मानुनि तरी सुखी महा ॥ ॥ मालराव सुत हाच पौत्र हा ॥ मी असें. घडतसे यथोक्त हैं | होय पक्कफलपाततुल्य है ।। ९३ ॥ ॥ बाजिराव अमुचे धनि नाना || पुत्र भित्रहि तसें गत नाना ॥ ॥ भेटतील मज देतिल हर्ष ॥ नित्य ईशपदिं राहिल शीर्ष ।। ९४ ॥ ॥ ह्या सुखाहुनि दुर्जे तरि कोणते । चांगलें सुख असे चिर कोणतें ? ।। ॥ पोर हे पण नसे बहु जाणतें । काळजी इतुकिही मनिं बाणते ।। ९५ ।। ॥ घ्या करांत शिशुचा कर दादा घ्या पाटिल ! तुह्मी मज मोदा ॥ ॥ द्या, निवेल मग घोरच सर्व ।। थंडगार मम होइल जीव" ।। ९६ ।। ॥ मल्हारजीनें मग पौत्रपाणितें । दोघाजणांच्या कारें देउनी तिथें ।। ॥ तुकोजिहस्ती दिधतांहि तो झणी । बोले उभा राहुनि हस्त जोडुनी ॥ ९७ ॥ ॥ "पर्दारिं मी अपुल्या स्थित चाकर । धनिकरामधिं यास्तव मत्कर ।। ॥ दिउनियां करणें मम सोय ती । उचित है असतां, कशि ही कृती?"९८॥ ॥ गुणपरीक्षक होळकर स्थिर ।। करि तयाप्रत ह्यापरि उत्तर || “ बल तुझें स्तुतिपात्र बहूतसें । रिपुभयावह शौर्य तुझें असे ॥ ९९ ॥ ॥ तव पराक्रम आक्रमि सर्व ही ॥ बहुत खोल असे तव बुद्धि ही ॥ ॥ विलसती सुविचार तुझे अती ॥ झळकते तव निर्मलशी मती । १०० । ॥ श्रीमंत यांची ह्मणवोनि चाकरी ॥ न डाग ज्या, तें मम नाम त्यापरी ॥ ॥ मनापरी तूंच सदा सुरक्षित ॥ बुद्धिप्रभावै करशील निश्चित” ॥ १०१ ॥ ॥ वदुनि ह्यापरि तो स्थिर हो. जरी ॥ समरशूर असे बहु हा तरी ॥ ॥ न वधितां जितशत्रु हरीपरी ॥ उलट त्यांवर थोर दया करी ॥ १०२ ॥ ॥ जरि उदार तरी जलदापरी ॥ न भलत्या स्थलिं दृष्टि कधीं करी ॥ ॥ बहुतची जरि धीट असे तरी ॥ न कधिं साहस मूर्खपणें करी ॥ १०३ ॥