पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ ॥ स्वकरीं धरुनी तुझी अह्मां ॥ करियेलें जनिं माणसें पहा ॥ ॥ अपुले गत बंधु हो पिता ॥ जगणे ठीक नव्हे अह्मां अतां ॥८३॥ ॥ कधिंही न अह्मी कृतघ्नतें ॥ करूं कांहीं अपकारकारि तें ॥ ॥ करण्यांत अस सदोदित ॥ अमुचें हो कुल शील दूषित ॥ ८४ ॥ ॥ ह्मणतों वदतां न आणखी ॥ उगिं ह्या अज्ञ मुलांस लौकिकीं ॥ ॥ स्थित ठेवुनि चाकरी गृहीं ॥ चिर घ्या त्यांकडुनी विनंति ही ॥ ८५ ॥ ॥ अमुच्याकडुनी पुढें अतां ॥ श्रम होणें नच शक्य तत्वतां ॥ ॥ बसल्या स्थलिं अन्नवस्त्र जी ! । दिधणें प्राप्त तुह्मां अह्मां अजी॥८६॥ ॥ अमुचे मिटतां सदोदित ॥ मग डोळे, जगि नांव रक्षित ॥ ॥ करतील मुलें सदैव हीं || धुणिपाणी अपुलीं करूनिही" ।। ८७ ।। ॥ मल्हारजी अश्रु वदूनि ह्यापरी || डोळ्यांस आणी, पण उत्तरा करी ॥ ॥ दादा न त्या. देइ निरोप त्यां पुढें । देऊनि कंठ्या शिरपॆच चौकडे। ८८ ।। ॥ मल्हारजी गोहदच्या कलींत पडूनि, राणा तिथला प्रमत्त ॥ ॥ दादापदीं नम्र करी, बहूसा ॥ त्यापासुनी देववि खंड तैसा ॥ ८९ ॥ ॥ ये हे तिघे वीर अलंपुरांत ।। ॥ मल्हारजीचा अति कान येथ ॥ ॥ लागे दुखूं त्याजमुळें तयाचा। आसन्नकाल* स्थित होय साचा॥९०॥ ॥ महादजी त्यापरि मालराव ।। तुकोजि आणी रघुनाथराव || ॥ समीप होते स्थित ह्या प्रसंगी || बहूत से दुःखित अंतरंगी ॥ ९१ ॥

  • इ० स० १७६५ मध्ये मल्हाररावाचा काल झाला ह्मणून म्यालीसन साहेब व मालकम साहेब आपआपल्या ग्रंथांत लिहितात. ह्या दोन्ही साहे- बांच्या ग्रंथांत मल्हाररावाच्या जन्ममरणकाळाचा मुळींच मेळ बसत नाहीं ; कारण इ० स० १६९३ मध्ये जन्मून मल्हारराव आपले वयाचे ७६ वे बर्षी इ० स० १७६५ मध्ये निवर्तला, ह्मणून सदहु ग्रंथांत उल्लेख आहे ! आमच्या- जवळच्या मराठी बखरींत शके १६८९ भाद्रपद वद्य ११ एकादशीस प्रहर दिवस चढतां सुभेदार पंचत्व पावले ह्मणून लिहिलें आहे.