पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३ ॥ पूर्वी जैसा कीचकत्रासिता जी ॥ त्या सैरंध्रीपास तो भीम गाजी ॥ ॥ तैसा वेगें घेउनी सैन्य सर्व ॥ झाशीपाशी येइ मल्हारराव ॥ ७४॥ ॥ त्या रांगड्यांस फसवोनि अशा प्रकारें H ॥ झाशीस वेदुनि, तिच्यांतिल सैन्य सारे ॥ ॥ ठोकून, वाकवुनि हिम्मतबाहदुरा ॥ ॥ येतांच तो शरण देउनि त्यास थारा ॥ ७५ ॥ ॥ उन्मत्तहस्तिकृति जे दतियानृपाल ॥ ॥ तो शेवडेनृप दुजेहि तसें अडेल ॥ ॥ ते सर्व नम्र करुनी स्वबलांकुशानें ॥ ॥ मल्हारजी बहु हरी करभार मानें ॥ ७६ ॥ ॥ ह्यानंतरी तो रघुनाथदादा || महादजी सांप्रत मुख्य शिंदा ॥ ॥ मल्हारजीलागि ससैन्य येथें ॥ हे भेटतां, जाति पुढे तिघे ते ॥७७॥ ॥ राणा मधे गोहदचा दुरा ॥ सैन्यीं करी लूट ह्मणून रोषें ॥ ॥ त्या शासण्यातें हरण्यास गर्व ॥ दे त्यास वेढा रघुनाथराव ॥ ७८॥ ॥ परंतु आंतूनि सहाय शिंदा ॥ आहे तया है परिसोनि दादा ॥ ॥ महादजी यावर कुप्त होतां ॥ मध्यस्थ हो होळकरार्य आतां ॥७९॥ ॥ भेटाया जो पौत्र हो प्राप्त सध्यां । मालेरावा त्या, तसें खिन्न शिंद्या ॥ ॥ घेऊनीयां नेइ मल्हारराव ॥ दादापाशीं साधण्या मेळ पूर्व ॥ ८० ॥ ॥ दादासमीप रिघतांक्षणि ह्या तिघांनीं ॥ ॥ केले पटापट तया मुजरे लवोनी ॥ || दादा वदूनि कृति ही अपुली बरी न ॥ ॥ मल्हारजीस बसवी जवळी समान ॥ ८१ ॥ ॥ मग होळकराग्रणी वदे || "लघु आह्मी अपुल्या घरामधें ॥ ॥ शिशु तातगृहीं जसै, तसें ॥ लडिवाळीं चिर वाढलों असे ॥८२॥