पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ ॥ नजिबखां लढुनी समरीं अती । उडवि सूरजमल्ल शिराप्रती ॥ ॥ हटुनि पौत्र तदीय रणांत जी || नवलसिंग करी बहु काळजी । ६६ । ॥ मल्हारजी तेथ ससैन्य येतां ॥ हा जाट आनंदित होय आतां ॥ ॥ सेनेंत त्याच्या पण होय फूट ॥ अभीष्ट तेणें उतरे न घाट ॥ ६७ ॥ ॥ होता तसा यवन तो झटला स्वकीय ॥ ॥ दोघांत होळकरवीर ह्मणोनि वर्य ॥ ॥ जन्मेजय क्षितिपतक्षकजिह्मगांत ॥ ॥ जैसा सुरेंद्र, करि साम तसेंच युक्त ॥ ६८ ॥ ॥ देण्या सुजाउद्दवल्यास साह्य || मल्हारजीवीर रणी असह्य ॥ ॥ स्वकीय राज्यीं नसतां, फिरोनी ॥ उठाव केला बहु रांगड्यांनीं । ६९॥ ।। जो आपणा ह्मणवि हिम्मतबाहदूर ॥ ॥ गोसावि जो अमुदगीर* तया समोर ॥ ॥ हे रांगडे करुनियां उठले सरोष || ॥ कोल्हेच काय नसतां वनिं सिंहवास ।। ७० ।। ॥ ह्यांनी स्वसैन्ये दतियांतुनी झणी ॥ आणोनियां त्यापरि शेवड्यांतुनी । ॥ दुज्या स्थलांतूनिहि मेळवोनियां। झाशींत नेलीं तिजला जितानियां७१ ॥ होतांच है विदित होळकरास, वेगें ॥ ।। तो शेवड्यावरच चालुनि जाय आंगें ॥ ॥ त्यानॆ प्रहार करितां तिकडे पुरा त्या ॥ झाशीच मूच्छित पडे इकडे क्षणीं त्या ॥ ७२ ॥ ॥ भ्याले बहू कारण रांगडे ते ॥ ये रक्षण्या तेथुनि शेवड्या ॥ ॥ मूलींच टोला बसतांच ऐसा । विस्तार शाखा धरतील कैसा ? ॥७३॥

  • अमुदगीर गोसावी ह्मणून कोणी बादशाहीतील सरदार होता.