पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कविता करण्याचा व निबंध लिहिण्याचा त्यांस फार नाद असे. ते मोठे मार्मिक, रसज्ञ, व बहुश्रुत होते, हें त्यांची कविता जे वाचतील त्यांच्या सहज लक्षांत येईल. "दादोजी कोंडदेवाचा छत्रपती शिवाजी महाराजास उपदेश" व "मल्हारराव होळकरावर काव्य" या दोन ग्रंथांस दक्षिणा प्राईझ कमिटीने अनुक्रमे ५० व २०० रुपयांचीं बक्षिसे दिली. त्या पैकीं पहिलें काव्य तर मार्गेच छापून प्रसिद्ध झाले व प्रस्तुत काव्य आतां श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर यांच्या औदार्यानें छापण्याचा योग जमून आला. या शिवाय शास्त्रि- बुवांनी अनेक स्कूट विषयावर कविता केलेली आहे. त्यांनी "सुंदरी काव्य" नांवाचा एक ऐतिहासिक पद्यग्रंथ लिहिला आहे परंतु तो अपूर्ण आहे. " खिळ्यावर रूपक" नांवाचा विनोदपर एक निबंध लिहिला आहे. तसेच " प्रस्तुत कालोन नाटक प्रयोग " या विषयावर एक निबंध लिहिला आहे. ते मोठे शीघ्र कवी होते. एके प्रसंगी त्यानी श्रीमंत महाराज होळकर सरकार यांजवर पुढील श्लोक केला तो पाहून महाराज साहेबांनीं त्यांस शेला पागोटें इनाम दिलें. ॥ मालवपालक रक्षि प्रजा द्विज सेवि शिवा शिव नित्य मनानें ॥ ॥ दुष्ट जनावारे रुष्ट सदोदित शिष्ट जनावारे तुष्ट मुदानें ॥ ॥ वीरजनामधि शूराच तद्विषु बोलत यासह युद्ध नकोजी ॥ ॥ हाचि वसो चिर इंदुर पत्तनीं होळकर प्रभुराव तुकोजी ॥ शास्त्रीबोवांची प्रकृति मुळचीच अशक्त होती; पुढे त्यास क्षय होऊन त्यांतच त्यांचा अंत ता०२५ मे १८८३ इसवींत झाला. त्या वेळी त्यांचे वय अववें ३३ वर्षांचें होतें. शेवटीं अतिशय अजारी