पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथशास्त्री करकंबकर यांचें चरित्र. प्रस्तुत काव्याचे कर्ते के० एकनाथशास्त्री यांचा जन्म स० १८५० इसवींत करकंब येथे झाला. त्यांची बुद्धि फार विशाल होती. लहानपणी ७१८ वर्षांचे असतां त्यांच्या वडिलांनी त्यांस रघुवंश कान्याची संथा देण्यास आरंभ केला. तेव्हां दोन तीनदां श्लोक सांगितला कीं, तो पुन्हां सांगण्याची अवश्यकता पडत नव्हती. तो ते तेव्हांच पाठ ह्मगून दाखवीत. पुढे त्यांस ज्योतित्र शिकण्याकरितां वैजापुरास वाळंभट जोशी यांच्या जवळ ठेवले. तेथे १४ व्या वर्षी त्यांची ग्रहलाघवादि ग्रंथांत बरोच गति झालो. पुढे ते इंडुरास आले, तेथें त्यांचे वडील अण्णाजी पांडुरंग जोशी भारतीबुवा यांचें चातुर्मास पुराण चालू होते. त्या अवकाशांत मुहूर्तमार्तंड नामक ज्योतिजावरील ग्रंथ ते शिकले. त्यांनीं प्रथम नशिराबादेस इंग्रजी शिकण्यास आरंभ केला, तेव्हां त्यांची फार गरीब स्थिति होती. फी भरण्याचे देखील सामर्थ्य त्यांस नव्हते, परंतु त्यांनी पहिला नंबर ठेवून फी भरण्याचा प्रसंगच वडिलांस येऊं दिला नाहीं. सुमारे वर्षा नंतर ते, तर्थिरूप व मातोश्री यांसह इंदुरास आले. येथील इंग्रजी मदरशांत त्यांनी इंग्रजी अभ्यास पुरा केला. सन १८७५ सालीं त्यांची मुंबई युनिव्हर्सिटीची प्रवेश परिक्षा उतरली. नंतर त्यांनी येथील हायस्कुलांत असिस्टंट मास्तराची चाकरी धरली. ती शेवट पर्यंत ते करीत होते. लहान- पणापासून त्यांची शरीर प्रकृतां फार अशक्त होती त्यामुळे कालेजांत जाऊन पुढे अभ्यास करण्याचा हेतु त्यांस सोडून द्यावा लागला.