पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन आठ दिवसांनी अंत होणार अशा वेळी त्यांचे वडील भारती- बुवा त्यांस ह्मणाले, " तूं इतक्या कविता केल्यास परंतु आपला कुल स्वामी खंडोबा यावर कांहीं केल्या असत्या तर चांगले झाले असतें ". तेव्हां शास्त्रीबुवा ह्मणाले “आतां मला लिहिण्याचे सामर्थ्य नाहीं. तुह्मीं लिहित असाल तर सांगतों. " मग त्यांनी वडिलांस बिछान्यावर पडल्यापडल्या पुढील आर्या सांगितली. ॥ कल्पद्रुम मल्हारी भक्तांची सर्व संकटें वारी ॥ ॥ भारी थोर जगामधि तारी संसार झाळसाधारी ॥ त्यावर भारतीबुवा ह्मणाले " एक कविता शंकरावर कर . " तेव्हां शास्त्रीबुवा ह्मणाले " शंकरावर दुसरी कविता करणे नको वरील आर्येत थोडा फेरफार केला झगने ती शंकरावर लागू होते. " येणेप्रमाणे. ॥ त्रिपुरारी मल्हारी भक्तांची सर्व संकटें वारी ॥ तो फेरफार ॥ भारी थोर जगामधिं तारी संसार अंबिकाधारी ॥ १ ॥ शास्त्रीबुवांची कविता, स्वाभाविक आवेशयुक्त, रसभरित व प्रसंगविशेषी मोठी विनोदपर आहे. तींत संस्कृताचें फाजील मिश्रण नाहीं व प्रायः ती दुर्बोधही भासत नाहीं. ते ईश्वर कृपेनें कांहीं वर्षे वांचते तर त्यांच्या हातून चांगले ग्रंथ निर्माण झाले असते अशी आशा होती त्यांच्यांत कल्पनाशक्ति प्रखर होती. मनुष्य स्वभावाचें ज्ञान त्यांस चांगलें होतें असें त्यांची कविता वाच- णारांस सहज कळून येण्यासारखे आहे. परंतु ती कल्पकत रसज्ञता, बहुश्रुतता, विनोदपरता या सर्वांस अकस्मात विराम मिळाला. त्यांचा पूर्ण विकास होग्याच्या पूर्वीच त्यांचा कर्त्याबरोबर अंत झाला.