पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८.. ॥ स्वनाश होईल तरी असा महा ॥ समर्थ होऊन लढावया पुन्हा ॥ जो स्वाधिकारात्मकत्रृक्ष वर्धित || समूळ तेणें उलथेल निश्चित। २३ ॥ ॥ टोळ्या करोनी॰ लढणें अनावृत ॥ वाटे बरे; कारण हो पराजित ॥ ॥ टोळी जरी एक, दुजी तिजी तरी ॥ होईल शौर्यै जयवंत संगरीं। २४ ॥ ॥ बरे कुणीही विजयी न हो जरी ॥ तयामधीं स्वाहित कोणतें तरी ! ॥ ॥ सर्वस्व घेऊनि सुखांत आपण ॥ जाऊं स्वदेशीं, परतूं हि मागुन ॥२५॥ ॥ बरें, मिळाला जय झुंजतां असें || सोन्याहुनीही पिंवळेंच फारसें ॥ ॥ येणेंकरूनी अपुलेच राहिल || महत्व येथें ध्रुवतुल्य निश्चल ॥ २६ ॥ ॥ ह्मणोनियां मी ह्मणों तसें लदूं ॥ विच्छिन्न वैरी करण्यामधीं गहूं ॥ ॥ घालून छापे दिनरात्र सारखे ॥ करूं अविधांस सुखास पारखे ॥ २७ ॥ ॥ थकून भागूनि वनांत चालतां । ते पीत हुक्के असतां विसंबतां ॥ ॥ घेरूाने त्यांलागिं कदा अकाधिक | भाजूं फुटाण्यां परि ते गवंतक ॥२८॥ ॥ उपोषणांनी गळुनी, पयीं कधीं ॥ चांबून, जो घालिति ते मुखामधीं । ॥ कदन्न, तो गाळुनि त्यां वनांतरीं ॥ केव्हां पिटाळू खरमर्कटांपरी ॥ २९ ॥ ॥ निमाजकल्मा पढत स्वजानुंला || टेकोनियां ते असतांहि त्यांजला ॥ ॥ वेदोनि ते जो नच होति सावधं ॥ केव्हां तयांची करूं तोच पारध । ३०॥ ॥ काहूनि दुःखातिशयें बहू असें || ते झोपवे जो बहु गोड गोडसे ॥ ॥ घेती न घेती झुरके निशाभरीं । त्यां तोच केव्हां पळवूं भुतांपरी । ३१ ॥ ॥ त्यां खानपानीं शयनासनीं असें ॥ गाटूनि ठोकून पिटूनि धाडसे || ॥ प्रसंग येतां कधिं सामना रणीं । करूाने, त्यांची नरडींच फोडुनी । ३२ । ■ अत्यंत त्यां जर्जर ह्यापरी सदा करून, त्यांचे मुखि' या! खुदा! खुदा!" ॥ ही अक्षरें घालुनियां, पुढे घट ।। त्यांची करूं चोहिकडे फुटाफुट॥ ३३ ॥ ॥ येथें न त्यांतें घरदार आश्रय । अपाप ते पावतिल स्वयें क्षय ॥ ॥ किंवा स्वरक्षा करण्यास, येथिल । जनानखाने फुगवानि देतिल”|३४|