पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ भाग नववा. ॥ ॥ मल्हारराव असतां स्थित दक्षिणेंत ॥ ।। शिंदे ससैन्य इकडे रणि उत्तरें ॥ ॥ गाजीवदीन यवनाप्रत साह्य देत ॥ ॥ होते बहू नजिबखां सह झुंज घेत ॥ १ ॥ || नजिबखां गिलचे अपुल्याप्रती ।। रणि सहाय करूनि लढे अती । ॥ सतत है असतां रण चालत || यवन तो यमुनातट हो स्थित ॥ २ ॥ ॥ खुलतसे यमुनेंत मर्धे तिथें । सुखद बेट, गमे दिसतांच तें ॥ ॥ जणु तदीय उरःस्थल अल्पसे || पदर जाउनियां उघडें दिसे ॥ ३ ॥ ॥ बेटास सोडूनि पठाण रोहिले || येण्या पुढे दोन हजार पातले ॥ ॥ घेऊनि थे|डे रणवीर सत्वर ॥ शिंदे तुटोनी पडले तयांवर ॥ ४ ॥ ॥ जें युद्ध हो घोर तदा, तयामधीं ॥ दत्ताजि आणी जनकोजि शौर्यधी ।। हे झुंजले फार असें घडीभरी ।। ते भासले राघवलक्ष्मणांपरी ॥ ५ ॥ टोकीत शत्रू असतां समोर || घायाळ झाला जनकोजि फार ॥ ॥ दत्ताजिचा होय ठिकाण नष्ट है । झाले मराठ्यांत फार कष्ट ॥ ६ ॥ $ ।। मल्हारजी घेउनि सैन्यराशी || होता क्षणी ह्या रजपूतदेशीं ॥ ॥ साह्यार्थ त्यातें जनकोजि यानें ॥ बोलाविलें त्या समयीं त्वरेनें ॥७॥ . ।। शिंदे अणी होळकरप्रवीर || एकत्र होतांक्षाणि सैन्यभार ॥ ॥ ठेवूनि तोंडी रिपुचे, तिथूनी । आग्र्याकडे ते वळले मिळूनी ॥८॥ 11 जें युद्ध मार्गे बहु होय दारुण || योद्धे नराठे रिपु त्यांत घेरुन ॥ || होते जया मेळविण्यांत निश्चये । तो म्लेच्छसेना रणिं फार अन्यये ॥ ९ ॥ | ॥ ज्या हो ‘खराडे' उपनाम, मल्ल || तो शेटिया होळकराकडील | ॥ ॥ योद्वा अन्याबा पळशीकराख्य || कामास येतां समरांत मुख्य ॥ १० ॥

  • यमुना नदीमध्ये हें शेरणीचे बेट होतें,

$ इ० स० १७५९ मध्ये दत्ताजी शिंदा धारा तीर्थी पतन पावला.