पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ ठाणीं तियें सुद्ध बैसवुनी स्वकीय ॥ ॥ जीवंत की स्वविजयप्रतिमाच काय ॥ ॥ मल्हारजीप्रभूतिवीर तिथुनि मार्गे ॥ ॥ स्वस्वस्थलों परतले मग सर्व वेगें ॥ ४३ ॥ ॥ कांही पुढे दिन सुखें क्रमित बसून ॥ ॥ मल्हारजीत पुण्यांतुन ये लिहून ॥ ॥ "पैसा तुह्मांकडुन सांप्रत येथ ये न ॥ ॥ श्रीमंत रुष्ट तुमच्यावर हो ह्मणून " ॥ ४४ ॥ ॥ है ऐकतांच अपुले चतुरस्त्र लोक ॥। ॥ धाडोनियां प्रथम, मागुन तो सशंक ॥ ॥ ये दक्षिणेत, उतरे मग जेजुरींत ॥ ॥ हें वर्तमान कळलें सगळे पुण्यांत ॥ ४५ ॥ ॥ नेण्या पुण्यामधिं तया सुत पेशव्याचा ॥ ॥ येई तिथे सुमति माधवराव साचा ।। ॥ तो ह्या सुतासहित शीघ्र पुण्यासमीप ॥ ॥ आला जणो घन सुखप्रद सेंद्रचाप ॥ ४६ ॥ श्रीमंत आणिक सदाशिवराव आंगें ॥ ॥ येऊनि नेति पुरिं सादर त्यास संगें ॥ || तो स्वस्थलास रिघतां स्वमनी सशंक ॥ ॥ त्यातें विचार सुचला मग शीघ्र एक ॥ ४७ ॥ ॥ मागील रात्र उरतां प्रहर स्वचित्तें ॥ ॥ तो पालखीत बसुनी, अपुल्या स्थलातें ॥ ॥ सोडूनि, अल्पजन घेउनियां स्वतांचे ॥ ॥ कीं शुक्र अन्य उदये गृहि पेशव्याचे ॥ ४८ ॥