पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

|| होठांच में विदित होळकराग्रणीतें || ॥ छापा अकल्पिक रिपूंवर शीघ्र तेथें ॥ ॥ घालूनि तो पळवि त्यास, परंतु राणी ॥ ॥ पेंढार सैन्य धरि ती मलकाजमानी ॥ ३७ ॥ ॥ पैढारियां कडुनि बेगम घेउनी ती ॥ ॥ मल्हारजी तिस तदा बहु तुष्ट चित्तीं ॥ || योग्यादरे करुनि धाडुनि दे सुखांत || ॥ दिल्लीमधीं स्वसुमती जणु मूर्तिमंत ॥ ३८ ॥ || मागूनि तोहि यवनेशपुरींत थाटें || 11 ॥ सैन्यासवें रिधुनि बादशहास भेटे ।। ॥ पावूनि मान धन आणिक जाहगीर ॥ मार्गे फिरे तिथुनि होळकरप्रवीर ॥ ३९ ॥ ॥ ह्यानंतरी रणवली रघुनाथराव ॥ ॥ घेऊनि होळकरवीर सर्वे निगर्व ॥ || देण्यास मार गिलच्यांस रणांगणांत || ॥ दिल्लीमधीं गमन तो करि सैन्ययुक्त ॥ ४० ॥ ॥ येतां इथे नजिबखां शरण स्वतांला || ॥ मल्हारजी तिथुनि त्याप्रत शुक्रताला ।। ॥ काहूनि वाचवि मयासुर ह्यास जैसा || ॥ कतेय खांडववनांतुन शीघ्र तैसा ॥ ४१ ॥ ॥ अग्रेसरत्व समरांतिल घेउनीयां ॥ ॥ महारजी बलि पुढे मग सर्मुनीयां ॥ || लाहोरनामकपुरास जितूनि मारा | ॥ देऊनि थोर, गिलचां रणि ठोकि सारा ॥ ४२ ॥

  • मराठी बखरींत लिहिलें आहे कीं, ह्यावेळी बादशाहाने मल्हाररावास नक्त ऐशी लाख रुपये दिले; व अंतरवेदीतील विटाव्या तालुक्यापैकीं कांहीं गांव बक्षीस दिले.