पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भागदवाः – जाटांचे पारिपत्य करण्यासाठी मराठ्यांनी कुंभेरीस वेढा दिला, त्या प्रसंगी मल्हाररावाचा एकुलता एक मुलगा खंडोजी ह्मणजे प्रसिद्ध अहल्याबाई होळकरीण हिचा पति प्राणास मुकला. भाग९वाः– १७५९ त यमुनेच्या कांटी मोठी लढाई झाली. तीत मराठ्यांचा सेनाधिपति दत्ताजी पडला व त्याचा भाऊ जनकोजी त्याच्या मरणामुळे हतवीर्य होऊन मोठ्या संकटांत पडला. ह्यावेळीं मल्हारराव राजपुतान्यांत होता. त्यास हें वर्तमान समजतांच तेथून निघून आला. इकडे पुण्यांत पेशव्यांस ही पराजयाची वार्ता मिळतांच सदाशिवराव भाऊ अफाट सैन्यानिशी येऊन दाखल झाला. ह्याप्रमाणें मराठ्यांचें सर्व सैन्य एकत्र मिळाल्यावर एकदम लढाई द्यावी किंवा नाहीं ह्याविषयीं विचार चालला. एकदम लढाई देऊनये अशी मल्हाररावाची सल्ला' होती. परंतु सदाशिवराव भाऊंनीं त्याचें ऐकिले नाहीं. मल्हारराव कानाच्या आजाराने १७६७ साली अलंपुरास निवर्तला. मरतेवेळीं महादजी शिंदा, तुकोजी, व रघुनाथराव पेशवे हे जवळ होते.