पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ ॥ जन्मे जगी मनुज तो मरतोच तेथ ॥ || आहे जरी खचित है तरि भेद त्यांत ॥ ॥ आहे असा, मनुज जे मरतात कांहीं ॥ ॥ सत्कारणींच, मत ते मृत हो कदाही ॥ २५ ॥ ॥ त्यांचाच मृत्यु अति धन्य, मरोनियांही ॥ ॥ पृथ्वीमधीं अमर ते असती सदाही ॥ ॥ तारेच होत पृथिवीवरचे महा ते ॥ ॥ रत्नेच होत तिचिया गळिंचीं जणो ते ! ॥ २६ ॥ ॥ ह्या कोटिंतीलच खरा तुमचा सुपुत्र ॥ ॥ जो ठोकित स्वरिपु चालवित स्वशस्त्र ॥ ॥ जो मुक्त देश करण्या निघतां स्वकीय ॥ ॥ पवेरणी मरण, तो नच रत्न काय ? ॥ २७ ॥ ॥ अहे किती मरण गोड तरी अहा ! हें ॥ ॥ चित्तास मोहुन किती तरि हर्ष दे हैं ॥ ॥ ह्याच्या पुढ़ें खचित तुच्छ असे स्वगेहीं ॥ ॥ सूनि कोट्यवधिवत्सर वाचणेंही ॥ २८ ५ ॥ घेऊनि राज्य परके घुसतां स्वदेशीं ॥ ॥ जो प्राण दे समरि, घालविण्यांत त्यांशी ॥ || देशाभिमानयत तोच उदार भारी || ॥ स्तुत्यर्ह तोच नर तोच परोपकारी ॥ २९ ॥ ॥ जो देशमुक्तिकरितां पडतो रणांत ॥ ॥ त्याचाच तो सफळ जन्म असे बहूत || ॥ त्या स्वर्गवास चिर, उद्धरुनी कुला तो ॥ ॥ निभ्रांत उत्तमगती पितरांस देतो ॥ ३० ॥