पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५ ॥ हा लागतो कर तुझा जणु शक्ति नीर ! ॥ ॥ जी उष्णता रणिं चढे रिपुमर्दनें ते ॥ ॥ गेली कुठे आणि करांतुनि सांग मातें ? ॥ ६ ॥ ॥ ऐसा तुझा अचल कां पडला सुकाय! ।। ॥ चांचल्य त्यांतुन कुठें रणजन्य जाय ? ॥ ॥ हो काय भाजुनि दशा तरि ह्या मुखाची ! ॥ ॥ गेली तयावरिल कांति कुठें यशाची ? ॥ ७ ॥ ॥ जी घाय घेउनि अनेक रणी सदांही ॥ ॥ छाती तुझी डगमगे न पुरा जराही ॥ ॥ ती आज भग्न कशि होय ! कुठे तियेचें ॥ ॥ सामर्थ्य जाय ? मज सांग मुखे स्वतांचे ॥ ८ ॥ ॥ येतां रणांतुनि तुझें मुख शौर्यगोष्टी ॥ ॥ सांगून देत अज कां मजला न तुष्टी? ॥ ॥ कां नेत्र आज मिटले ? रणकष्ट होतां ॥ ॥ आहेस काय तर निद्रित गाढ आतां ! ॥ ९ ॥ ॥ हा तात दीन तत्र मारित तूस हाका ॥ ॥ आहे, तयासहि न उत्तर देशि तूं कां ? ॥ ॥ आक्रोश फार पडुनी धरणीवरी ही ॥ ॥ माता करी तव, तिशी तरि बोल कांहीं ॥ १० ॥ ॥ ही स्त्री सती तव अचेतन भूमिभागीं ॥ ॥ आहे, तिला तरि उठींव उठूनि वेगीं ॥ ॥ हा लाडका सुत तुझा रडतो पहा कीं ॥ ॥ घेऊनि त्यास तरि तूं समजीव अंकी ॥ ११ ॥ ॥ आतां मदीय गुणि बोलत हा न पुत्र ! ॥ ॥ आतां मदीय कसला तरि ! मी अपुत्र ! ॥