पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ || भाग आठवा ॥ ॥ जाटास दंड करण्या रघुनाथपंत ॥ ॥ शिंदेहि होळकर ह्यासमयीं सुखांत ॥ ॥ कुंभेरनामकपुरारिघुनी संवेग || ॥ * वेढीत त्या रणधुरंधर हे त्रिवर्ग ॥ १ ॥ ॥ एकेदिनीं करित पौरुष देत वेडा || ॥ खंडूजिराव असतां रणवीर गाढा ॥ ॥ ते फेंतुनी मुटुनि शत्रुकडील गोळा || ॥ लागोनि त्यास हृदिं तो पडला भुईला ॥ २ ॥ ॥ भासे तदा सकळिकां पडला अकाली ॥ ।। हा वीर काय अभिमन्युच अन्य खालीं ॥। || महारजी त्यजुनि शुद्धिस ह्या कुवा ॥ ।। खालीं पडे गळुनि की गिरिं वज्रपातें ॥ ३ ॥ ॥ वेढा त्यजूनि मग तेथुनि सर्व वीर ॥ ॥ घेऊनि मूर्च्छिताच होळकरप्रवीर ॥ ॥ म्यान्यांत घालुनि तसा युवराजदेह ॥ ॥ गोटांत शीघ्र अपुल्या रिघले समोह ॥ ४ ॥ ॥ हो बायकांमधिं अकांत किती बरें तें ॥ ॥ होणार दुःख जननीस ! किती स्त्रियेतें !! ॥ ॥ मल्हारजी हळुहळू उठुनी अशांत ॥ || होऊन सावध विलाप करी बहूत ॥ ५ ॥ ॥ हे बालका! मम करा किति थंड गार ॥

  • इ० सन १७५४मध्ये मराठ्यांनी कुंभेरीस वेढा दिला होता.