पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ जाळीमधी, दडणिं, ढोलित, जेथ तेथें ॥ ॥ गुप्तस्थलां बघत शोधित भीत चित्तें ॥ ॥ हें काय संकट असे न कळोनि त्यातें ॥ ॥ सैरावरा चहुंकडे पळु लागले ते ॥ ५० ॥ युग्म ॥ ॥ अन्योन्यखाद्य पशु हे असतांहि आतां ॥ ॥ एकत्र जाति पळुनी पथि भेट होतां ॥ ॥ सर्वांसमान भय जें करितें असेंच ॥ ॥ जे जे परस्परविरुद्ध तयां सखेच ।। ५१ ॥ ॥ वृक्षस्थ पक्षिगण झोपंतुनी उठून ॥ ॥ लागे उहूं, पण अदृष्टि उडे ह्मणून ॥ ॥ दीपांवरीच फिरतां विधि, सारखेच ॥ || हो त्राणसाधन असून नसून साच ॥ ५२ ॥ ॥ येथें असा घडत हा असतां प्रकार ।। ॥ मल्हारजी त्वरित घेउनि अल्प वीर ॥ ॥ फेंकने अश्व तिमिरीं तिस-या दिशेनें ॥ ।। ग्लेंच्छांवरी तुळुनि तो पडला त्वरेनें ।। ५३ ॥ ॥ ते रोहिले दचकुनी उठले, मराठे ॥ ॥ पाहोनि सन्निध तयां भय फार वटे ॥ || देखोनि तोंच जिकडे तिकडे दिवेच ॥ ॥ भासे तयांस भडके वणवाच साच ॥ ५४ ॥ ॥ भासे तयांस मग लावुनि की मशाला ।। ॥ वेताळ घेउनि पिशाचगणा निघाला ॥ ॥ हे भास होत मनि जो क्षण एक त्यांचे ॥ ॥ लगेच तो उदरिं भल्ल शिरूं तयांचे ॥ ५५ ॥