पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षिनेकडून कोणी स्वधर्मी राजा मुसलमानांचा नाश करून आपले राज्य स्थानित करण्याकरितां हिम्मत बांबून येईल तर त्यास मना - " पासून सहाय्य देण्यास एका पायावर तयार होती. मल्हारराव व चि- मगाजी अप्पा ह्यांनी ही वेळ साधून माळव्यांत प्रवेश केला व मोगलांशी निकराच्या लढाया करून मराठ्यांची सत्ता स्थापिली. भागदवाः – ह्यानंतर मल्हाररावाने धार व उज्जयिनी ही पुरातन शहरें मुसलमानांच्या अमलांतून मुक्त केलीं. इकडे बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यास बादशाहाकडील अधिकारी महंमदखान बंग ह्यानें फार त्रस्त केले. त्याचे शासनार्थ बाजीरावानें बुदेलखंडांत जाऊन त्यास हाकून लाविलें व माळव्यांत मराठ्यांचा अम्मल पूर्णपणे बसवि- ला. ह्याप्रसंगीं मल्हाररावाने जे पराक्रम केले त्याबद्दल बाजीरावानें माळांत त्यास वंशपरंपरा जहागीर करून दिला. भाग देवाः – एके दिवशी दिल्लीपासून कांहीं अंतरावर कालिकेचा मेळा भरला असतां मराज्यांनी त्यावर अकस्मात् छापा घालून लूट आरंभिली, जो मुसलमान हाती सापडला त्याचो कतल उडविली, व सर्व मोगल सरदारांस जर्जर करून टाकिलें. ह्यानंतर मराठ्यांचे सैन्य कौकगांतील वसईचा किल्ला फिरंग्यापासून सोडविण्याकरितां दक्षिणत परत आले. भागश्वाः- - मल्हारराव आतां कुटुंबपरिवारासह राजाप्रमाणे दरबारी थाटांत राहूं लागला. तथापि लढाईचे काम अजून संपले नव्हतें. रोहि- लखंड व राजपुताना ह्या मुलखांत त्याने अनेक पराक्रम केले. १७५१त दिल्लीच्या बादशाहाने चांदवड परगण्याची सरदेशमुखी त्यास दिली व त्याच वर्गों पेशव्यांनी त्यास माळव्याचा सुभेदार केलें.