पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ ॥ ' हाडे ' ह्मणून रजपूत उमेदसिंग ॥ ॥ जो स्वाभि तेथिल खरा स्थित, त्या अभंग ॥ ॥ दे राज्य-थोर जन आश्रय देत ज्यांतें ॥ ॥ आश्रयपरीच फल अर्पिति गोड त्यांत ॥ ३६ ॥ युग्म ॥ ॥ ह्यानंतरी शरण माधवसिंग येतां ॥ ॥ मल्हारजी जयपुरास सवेग आतां ॥ 4 ॥ जाऊनि, तेथिल अमात्यचि मल्लखत्री ॥ ॥ फोडोनियां, भिडवि सैन्य समीप रात्रीं ॥ ३७ ॥ ॥ होतांच है विदित ईश्वरसिंग ह्यातें ॥ ॥ वालीकृती नृपति तो धरुनी भयार्ते ॥ ॥ येग्या अधींच जणु राघवबाण भल्ल ॥ ॥ प्राण त्यजी विष पिऊनि अभाग्यशील ॥ ३८ ॥ नव्हती. ह्मणून दिवाणानें मल्हाररावास फौजेसह सासू मात धुंडा येथ- पावेतों युक्तिप्रयुक्तीने आणिलें. नंतर त्यानें ईश्वरसंगास सांगितलें कीं, मल्हारराव होळकर मोठी फौज घेऊन सदर्हु ठिकाणी आला आहे; आपण फौज जमाकरून त्यार्शी सामना करावा. हें वर्तमान ऐकतांच राण्याचे हात- पाय गळाले. मराठे फार जवळ येऊन भिडले, व दरबारांतही फितूर दिसतो ह्मणून आतां आपली धडगत नाहीं त्या धास्तीने ईश्वरसिंगाने विषप्रयोग करून आपला प्राण दिला. हें वर्तमान लगेंहात दिवाणाने होळकरास कळविलें. मल्हारराव तत्काल जयपुरास दाखल झाला. राजाचें प्रेत पडलें होतें, त्यास अग्निसंस्कार करवून तेथें त्यानें स्वस्थता राखिली. मल्हाररावानें दुगशा न धरितां ह्या राज्याचा अपहार केला नाहीं. त्याने रामपुन्यांत सांडणीस्वार पा ठवून माधवसिंगास आणिलें; आणि त्याला पुत्र ह्मणून जयपुरच्या राज्यपदी स्थापित केले. माधवसिंगानेही ह्या उपकाराबद्दल मल्हाररावास पाऊणकोट रुपये नजराणा दिला.. ह्याशिवाय त्याने रामपुरा, हिंगळाजगड, टोंक, क धाकटा रामपुरा, इतक्या जागा होळकराच्या ताब्यांत दिल्या.-