पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ मल्हारजी जितुनि ईश्वरसिंग ह्याशी || ॥ जे बुंदिचें हरण तो करि राज्य घातें ॥ ॥ घेऊनि संधिमधिं त्याजकडूनियां तें ॥ ३५ ॥ सिंगाचा काल झाला होता ) ह्यानें मल्हाररावावर चाल केली. प्रथम रजपूत व मराठे यांच्या बिनीवरच्या लोकांमध्ये मोठी हातघाईची चकमक झडली, तीत रजपूत पराभव पावले. मग मराठ्यांनी राजा व त्याचे सैन्य ह्यांस वेढा दिला; व त्यांस कोठूनही दाणापाणी बिलकुल न पोहचे अशी त्यांनी तज- वीज केली. यामुळे ईश्वरसिंग जेरीस येऊन त्यानें आपला दिवाण राजामल- खत्री याच्या सल्लघानें मल्हारराव होळकराशी तह केला. तहांतील कलमें येणेंप्रमाणे:- (अ) बुंदीचें राज्य उभेदसिंग हाडे ह्यास परत द्यावें; ( ब ) व मराठ्यांस खंडणीबद्दल वीसलाख रुपये मिळावे. ( २ ) जयपुरवाला सवाईजयसिंग ह्याला माधवसिंग व ईश्वरसिंग अमे दोन पुत्र होते. त्यांत माधवसिंग वडील बायकोचा असून वयानें धाकटा होता; व ईश्वरसिंग लहान बायकोचा असून वयाने थोर होता. जयसिंगानें- ईश्वरसिंगास गादीचा वारस केलें. पुढे जयसिंगाचा काल झाल्यावर ईश्वरसिंग सिंहासनारूढ झाला. परंतु त्याला आपल्या सापत्नबंधूची भीति वाटू लागली. त्यानें माधवसिंगास जिवें मारण्याचा बेत केला. हा त्याचा बेत माधवसिंगाच्या आईस कळतांच, ती तेथून आपल्या मुलास घेऊन, आपले माहेर जे उदेपूर तेथे पळून गेली. उ. देपुरच्या राण्यानें आपल्या भाचास मल्हारराव होळकरांच्या संघानानें जयपुरच्या गादीवर बसविण्याचा निश्चय केला. मग तो राणाजी माधवसिं- गास बरोबर घेऊन, चंद्रावताच्या रामपुरा शहरामध्ये दाखल झाला. त्यानें मल्हारराव होळकरास सांगून पाठविलें कीं, माधवसिंग हा तुमचा भाचा आहे; त्याला जयपुरच्या गादीवर बसविण्याची आपण तजवीज करावी. असें दुसरें राजकारण उपस्थित झाल्यावर मल्हारराव फौजेनिशी तिकडे वळला. ईश्वरसिंग व राजामहात्री दिवाण त्यांचों मनें परस्परांविषयीं शुद्ध पुढे चालू