पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ ॥ गुणिजन रिघले जे तेथ तैं थोर साचे || ॥ असति जणु तटाकी हंस की मानसाचे ।। ॥ करूनि गुणपरीक्षा योग्य मल्हारजी त्यां ॥ ॥ सुखवुनि करि मुक्ताहारयुक्त क्षणीं त्या ॥ ३१ ॥ ॥ युद्धांत कोठें नसतां, खुशाल || ऐसा क्रमी होळकर स्वकाल ।। ॥ तेणें गमे तो जणु धर्मराज || त्या नावडेची कधिं नीच मौज ॥ ३२ ॥ ।। आतां त्वरें होळकरप्रवर्य ॥ उत्पन्न होतांक्षणि राजकार्य ॥ ।। सुतःसर्वे घेउनि सैन्यराशी ।। जाण्या निघे तो रजपूतदेशीं ॥ ३३ ॥ खंडूजिराव सुत होळकराग्रणीचा ॥

॥ की अर्जुनात्मज दुजा अभिमन्यु साचा ॥ ॥ दावीत शौर्य समरीं रणवीर आतां ॥ ॥ होता, सदा समरिं तो करि साह्य ताता ॥ ३४ ॥ ॥ वेगे ससैन्य शिरुनी रजपूतदेशी * ॥ रजपूत लोकांच्या मुलखांत मल्हारराव होळकराने केलेल्या ह्या पुढील दोन स्वायांविषयीं मराठी बखरींत जो वृत्तांत दिला आहे त्याचा सारांश येणें प्रमाणे :- (१) बुंदीचा राजा उमेदसिंग हांड हा अल्पवयस्क होता. ह्याची सापत्न माता जयपुग्वाला सवाईजयसिंग ह्याची बहीण होती. सापत्नमा- तेमध्ये आणि पुत्रामध्यें अतिशय प्रेम होते. परंतु जयसिंगानें हैं राज्य अपहार करण्याची बुद्धि धरली. भावाचें कपट बहिणीस समजतांच, ती उमेदसिंगाला घऊन पुण्यास पळून गेली. तथें मल्हारराव होळकर नुक्ताच हिंदुस्थानांतून आला होता. ती मल्हाररावाला शरण जातांच, त्याने तिला उमेदसिंगास बुंदीच्या गादावर पुन्हां स्थापन करण्याचे अभिवचन दिले. असें राजकारण उपस्थित झाल्यावर मल्हारराव परगणे नेवाई ( नेटाई ? ) प्रांत धुंडाड येथे सैन्यासह दाखल झाला. तो येथें सडी फौज घोडाराऊत घेऊन राहिला. पूढे जयपुरचा सांप्रतचा राजा ईश्वरसिंग ( कारण सवाई जय- [ पुढे चालू ]