पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५ ॥ मंत्री तदीय सुविचार तसे गुणाढ्य ॥ ॥ कीं नीतिमंत कवि, की गुरु धबिलाढ्य ॥ ॥ तेंसच मंगलकृती, बुध थोर, त्यांत ॥ ॥ मल्हारजी जणु खुले रवि शोभिवंत ॥ २६ ॥ ॥ रामाजिपंत पळशीकर हे दिवाण ॥ ॥ श्रीमंत ह्याकडुन त्यापरि जो प्रधान ॥ ॥ + गंगाधर स्थित, तुकोज, बुळे विठोजी ॥ ॥ संताजिवाघ, अणखी दुसरेहि गाजी ॥ २७ ॥ ॥ ह्यांचा विचार चिर घेउाने राजकार्य ॥ ॥ प्रत्येक तो नयबली करि वीरवर्य ॥ ॥ लोभी जसा कृपण वित्त, तसा स्वचित्तें ॥ ॥ निर्लोभ लोकहित तो जपि, वाढवी तें ॥ २८ ॥ ॥ चित्तीं न आणुनि जरा कधिं जातिभेद ॥ ॥ तो सौख्य देइ सकलांस सदा अबाध ॥ ॥ म्लेंछप्रजा शरण नित्य मनें असे जी ॥ ॥ ततेंहि सौख्य वितरी करि तीस राजी ॥ २९ ॥ ॥ कामें अनेक करुनी मग राजकीय ॥ ॥ तो सैन्य सांध्य समयीं निरखी स्वकीय ॥ ॥ घोडे पुढे फिरवुनी मग वेळ कांहीं ॥ ॥ वाड्यांत तो परत ये युत सेवकांहीं ॥ ३० ॥

  • रामाजीपंत पळशीकर हा सध्यां जे इंदुरांत पळशीकर दिवाण आहेत त्यांचा मूळपुरुष होय.

+ ह्याचे पुरें नांव गंगाधर यशवंत असें होतें. "हा लोकांत गंगोबातात्या ह्या नांवानें प्रसिद्ध असे. हा पेशव्याने नेमलेला मल्हाररावाचा कारभारी होता. हाच पुढे अहिल्याबाईच्या इच्छेआड आला.