पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" ५४ ॥ " वावगें ह्मणुन वा न वावगें । मी तुह्मां न पुसतें, मला उगें ॥ ॥ वाटतें चरण हे अतिप्रिय ।। मत्करांत विलसोत अक्षय " ॥ १५ ॥ ॥ " ते सदाहि असती तुझ्या करीं || ह्यांत काय अधिक प्रिये ! तरी ॥ ॥ स्वारिंत प्रतिदिनीं अलीकडे ।। राहशी, तव मनापरी घडे " ॥ १६ ॥ 66 "" “ तें खरें, पण सदैव काळजी | कापि फार सखया ! मनास जी ! ॥ ॥ जो रणांत असतां तुह्मीनिया ! | तो नसेच मनिं धीर माझिया ॥ १७॥ ॥ " मी कदाहि रणि जाउं लागतां ॥ देशि धीर मज थोर तत्वतां ॥ ॥ हें कसें उलट आज भाषण || बायकाच तुलि भ्याड एकुण ॥ १८ ॥ ॥ " कां न बाइ ! मज जात घेउन ॥ त्या लढाईत तरी घरांतुन ? ॥ ॥ बायकाच अह्नि भ्याड की तदा ॥ हैं तुह्माप्रत कळेल सर्वदा ॥१९॥ ॥ बायकोस अथवा लढाइतें ॥ मी जपूं ? वद, कसें करूं तिथें ? ॥ ॥ मी त्वदीय पुरुं घाम ? की रणीं । घाम आणुं रिपुल, गिं त्या क्षणीं ?"। २० । " घाम येइल अहा ! मला तिथें ॥ घाम ये ज़रि कुठे तया भितें ॥ ॥ मीहि होळकर बायको खरी ॥ काय मी डगमगे पहा तरी " ॥ २१ ॥ ॥ " थोर धाव इतुकी तुझी जरी ॥ काळजी करिशि कां अशी तरी ? ॥ ॥ संगरांत असतों अह्मी सदा ॥ बोलशी न पण ह्यापरी कदा " ॥ २२॥ ॥ “ खंडु बाळ बहु हूड तो असे ॥ त्यास जा जपत फार फारसें ॥ ॥ तोहि वीरशिशुची असे तरी । काळजी उगिं भिणेंच अंतरीं ॥२३॥ ॥ “ देख व्राण सतिचेंच निर्भर ।। घेतलें अलि असे निरंतर ॥ ॥ पाहिजे मग कशास घोर हा ! | शंभु साह्यच असो सदा अह्मां” ॥ २४ ॥ ॥ गोष्टी अशा कधिं करीत बहू सुखांत ॥ 66 66 - ॥ तो वामकुक्षि करि चार घडी निवांत ॥ ॥ विश्रांति घेउनि अशी मग तो तिथून ॥ ॥ होइ विराजित कचेति सुप्रसुन्न ॥ २५ ॥