पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ ॥ तैशी स्नुषा अल्पवयी अहल्या ॥ साध्वींत साध्वी सुकृती अतुल्या ॥ ॥ शिवार्चना सासुसमीप मौनें । बसे सदा प्रेमळ मानसानें ॥ ७ ॥ ॥ तो वेदमूर्ति जणु शंकरभट्ट वृद्ध ॥ ॥ नामावली शुभ उमापतिची विशुद्ध ॥ ॥ बोले तदा, तदनुसारच वेगळालीं ॥ ॥ तीं बेल वाहत तिघेजण शंभुभालीं ॥ ८ ॥ ॥ म्यानांतुनी उपसुनी तखार तीचें ॥ ॥ पाणी पहात अथवा कधिं बंदुकीचें ॥ ॥ खंडोजीराव सुत पाहत रूप तेव्हां ॥ ॥ काळ कमी करत कृत्य असेंच किंवा ॥ ९ ॥ ॥ पूजा अटोपुनि करूनि बहूत दानें ॥ ॥ पत्नी स्नुषा सुत बरोबर आवडीनें ॥ ॥ घेऊाने एकवट तो मग भोजनार्थ ॥ ॥ थाळ्यावरी बसतसे बहुशा सुखांत ॥ २० ॥ ॥ मध्ये विनोदपरगोष्टि तदा करीत || ॥ पत्नीस सूनुस सुनेप्रत लाजवीत ।। ॥ तो भोजनास अटपोने, रिघे स्वचित्तें ॥ ॥ अंतर्गृहामध विराम करावया ।। ११ ।। ॥ गुणवती पतिदैवत गौतमा । शयनिं कांतपदाब्ज मनोरमा ॥ ॥ चुरित ती चिर सन्निधची वसे ।। कधिं परस्परभाषण हो असें ॥१२॥ ॥ " प्राणनाथ ! सरकार ! चाकरी ॥ ही मला अवडते किती तरी ॥ ॥ डागिणा मज कधींहि शाही ॥ ह्यापरी न अवडे अमोल ही " ॥ १३ ॥ || “हे सखे ! विमल नित्य अंतरीं ॥ ज्या तशाच कुलवंत, सुंदरी ! ॥ ॥ अंगना असति त्यां असेंच गे ॥ वाटतें सतत, है न वावगे " ॥ १४ ॥