पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ ॥ भाग सातवा ॥ ॥ मल्हारजी समयीं ह्या चिर माळव्यांत ॥ ॥ स्थापोनि राज्य दृढ, त्यापरि दक्षिणेत ॥ ॥ त्या जाहगीर असुनी बहु थोर आतां ॥ ॥ संसारसौख्य उपभोगित गोड होता ॥ १ ॥ ॥ नेमें सदा उठुनियां अरुणोदयींच ॥ ॥ प्रातर्विधी अटपुनी मग तो सवेंच ॥ ॥ हो प्राप्त मल्लगृहिं दंड हजार तेथ ॥ ॥ काने, दोन घडि कुस्ति लढे निवांत ॥२॥ ॥ तो तीन चार मग शेर पिऊनि दुग्ध ॥ ॥ जे प्रीतितील सरदार रणप्रसिद्ध ॥ ॥ त्यांसार्ध बोलत कथा रणिच्या खुशालीं ॥ ॥ पावे विराम घटिकाभर अश्वशालीं ॥ ३ ॥ ॥ सैन्याधिकारि बहु मानकरी स्वतांचे ॥ ॥ तेव्हां तिथें असत जे मुजरे तयांचे ॥ ॥ तो घेत घेत चिर बोलत गोड त्यांशीं ॥ ॥ स्नानार्थ तेथुनि उठे मग पुण्यराशी ॥ ४ ॥ ॥ स्नानास तो कहनियां बहुशा जलानें ॥ ॥ पाटावरी बसुनियां मग शुद्धतेनें ॥ || आंगास भस्म बहु चर्चनि आवडीनें ॥ ॥ लागे शिवार्चन ढं करण्या मनानें ॥ ५ ॥ ॥ गौतमा सुमति अंगनोत्तमा | भक्तिमान परमा, सुरोत्तमा ॥ ॥ पूजिण्यास नमग्यास मानसें ॥ ती सदा पतिसमीपची असे ॥ ६ ॥