पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० ॥ वराहदेहीं, जणु की घनाचे || खंडीं, तदा दांत सुळे तयाचे ॥ ॥ भासे उदेले यवनांप्रतीच । कीं धूमकेतूच अनिष्ट साच ॥४८॥ ।। मल्हारजी आदिकरून वीर || हे जीस अष्टादश हस्त घेोर ॥ || आहेत की ती जयवंत सेना । चंडीपरी ये पहिल्या ठिकाणा ॥ ४९ ॥ ।। पुढें बहू क्रुद्व अविंध लोकां ।। घेऊनियां मीरहुसेनकोका ।। ॥ तसाच राजा शिवसिंग कोपी । ये संगरी मुझफरखान गप्पीं ॥५०॥। ।। स्वशौर्यरूपी जणु घाणियांत ।। तिळांपरी मोगल हे बहूत ॥ ॥ पिळूनियां होळकरें तयां वें | ।। मल्हारजी मीरहुसेनको का || ।। प्रताप शिंदेहि करूाने थोर । " काढीयले खूपच तेल साचें ॥ ५१ ॥ धाडी स्वभल्ले यमराजलोका ॥ करी स्वखङ्गे शिवसिंग ठार ।। ५२ ।। ।। शूरत्वकृत्यें आीं हीं बघोनी ।। चित्तीं अविधीं बहुसें भिऊनी ॥ ।। केलें तहा; त्यामाधं पेशव्यास ॥ हो लब्ध संपत्ति बहूत देश ॥५३॥ ॥ श्रीमंत ऐसे विजयी मराठे ।। घेऊन येतांचि पुण्यांत थाटें । ।। दे कोंकणीं क्लेश फिरंगि त्यांतें । श्रीमंत जाती मग शासण्यातें । ५४॥ ॥ दंडोनियां वाकवुनी फिरंगी || हे पेशवा घेउनि वीर जंगी ॥ 1 घेण्या समाचार निजाम याचा | भोपाळच्या सन्निध लावि मोर्चा । ५५॥ ।। है पेशव्याचें बहु सैन्य थोर ॥ प्रचंड पूरापार सर्वदूर || ॥ विस्तारतां मोंगलसैन्य त्यांत ।। ग्रामापरी सांपडलें विभक्त ॥ ५६॥ ।। सरोनि किल्ल्यांतिल अन्नपाणी । तें मोंगलांचे दळ दीनवाणी ॥ ॥ होऊनि भारी जठराग्नितायें ॥ चित्तामधीं थर्थर फार काँप ॥ ५७ ॥ ॥ टोळ्या तयाच्या मग भिन्न भिन्न ॥ बाहेर नाना पडतां लपून ॥ ॥ पळावया, त्यांस चहोंकडोनी ॥ मल्हारजी वेढि असें हयांनीं ॥५८॥

  • हे मोगल सरदार होत.

+ ही भोपाळची लढाई इ० स० १७३८ मध्ये झाली.