पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९ ॥ सर्वस्थलीं दुंदुभिचे दुरूनी ।। आहेत ऐकूं व येत कानीं ॥ ॥ आहे तसा होत तयांत भिन्न । अविधशद्व श्रुत "दीन, दीन " ॥ ३६ ॥ ॥ आहेत गोळया बहु, आणि गोळे ॥ चोहीकडे वर्षत तापलेले ॥ ॥ टापा हयांच्या ध्वनेि खाडखाड ॥ आहेत सर्वत्र करीत चंड ॥ ३७ ॥ ॥ टेंभे मशाली बहु पेडुनीयां ॥ उजेड त्यांचा अति फांकुनीयां ॥ ॥ चकाकत स्वच्छ तदा बहूत ॥ आहेत शस्त्रे तशि नग्न त्यांत ॥ ३८॥ ॥ ऐशा बहू घोरतर प्रसंगीं ॥ योद्धे मराठे रणशूर जंगी ॥ ॥ भीतां न मार्गे सरतां न थोडें ॥ गेले पुढे घालित शीघ्र घोडे ॥ ३९ ॥ ॥ ते शीघ्र आले कबरेसमीप ॥ तो ग्लेच्छ यांचा समुदाय मोप ॥ ॥ होता तिथें क्षोभुनि लोटलेला ॥ चित्तामधी फारच तापलेला ॥ ४० ॥ ॥ न ह्या अविंधांमधिं खांडवांत ॥ न वीर हे अग्निच फार तप्त ॥ ॥ पडून, वेढूनि सवेग त्यांतें ॥ त्यां लागले भस्म करावया ॥ ४१ ॥ ॥ अविंधविध्वंस असा सगर्व ॥ अत्यंत चालू असतां अपूर्व ॥ ॥ जो पूल होता कबरेसमीप ॥ मल्हारजी त्यावर कालरूप ॥ ४२ ॥ ॥ ये, म्लेच्छ त्यानें तिथले स्वभल्लें ॥ कापोनियां ते स्थल साफ केलें ॥ ॥ योद्ध्या तुकोजीत शोधितांच ॥ तो सूकरासार्ध असे तिथेंच ॥ ४३ ॥ ॥ युग्म ॥ ॥ त्यानें पुलाच्या मग मध्यभागी ॥ गाडोनियां भल्ल अनेक वेगीं ॥ ॥ टोंकें तयांचीं खुपसोनि पोटीं ॥ टांगायला सूकर ऊर्ध्व थाटीं ॥४४॥ ॥ पूर्वी हणी सोरटिसोमनाथा ॥ जो एक सोटा महमूद, आतां ॥ ॥ येणेंपरी होळकरें तयाचा ॥ काढीयला कीं वचपाच साचा ॥ ४५ ॥ ॥ पुलावरी टांग न तो वराहा ॥ भाळा जणो की कबरेचिया हा ॥ ॥ तो डाग लावूनि तियेस लोकीं ॥ सदैव विद्रूप करूाने टाकी ॥४६॥ | फोडोनि देवप्रतिमा अनेक || होता अविधे अणिला कलंक ॥ ॥ जो हिंदुशौर्या, जणु ताच तेथ । टांगी वराहाकृति मूर्तिमंत ॥ ४७ ॥