पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ राः - - - मल्हाररावाचे लग्न नारायणरावाची मुलगी गौ- नारायणरावाची बायको ( ह्मणजे मल्हाररा- तमाबाई इशीं झालें. वाची मामी ) ही या गोष्टीस प्रतिकूळ होती. त्यामुळे आतां मामीशीं सलोख्याने राहणें दुरापास्त झालें. तो लवकरच तें घर सोडून मव्यहिंदुस्थानांत बांडे ह्मणून प्रसिद्ध सरदार होते, त्यांजपाशीं चाकरीस राहिला. तांत बांडे हे निजामावर स्वारी करण्यास निघाले त्यांजबरोबर महारजीस जाण्यास आयतेंच भि- ळाले. एकदां बांड्यांचे व पेशव्यांचे सैन्यांमध्ये कांहीं कारणा- वरून बेबनाव झाला, तो मल्हाररावानें आपल्या मध्यस्थीने नाहींसा करून पूर्ववत् त्यांवें सख्य केलें. ही गोष्ट पेशव्यांस कळली तेव्हां त्यांस संतोत्र झाला व त्यांनी मल्हाररावास बांड्यांपासून मागून घेऊन त्यास आपले पदरीं पांचशे घोड्यांचा नाईक करून ठेविलें. १७२४, १७२६, १७२८, ह्या सालांत खानदेशांत दंडखान याशीं युद्ध करून मल्हाररावाने शरत्वाविषयीं मोठे नाव संपादन केलें व पेशव्यांचे वतीने कर्नाटक व हैद्राबाद या दोन मुलखांत मोठे जय मिळविले. या कामगिरीबद्दल पेशव्यांनी त्यास १२ परगग्यांची जहागीर दिली. भाग ४ था :- दक्षिणेतल्याप्रमाणे उत्तर हिंदुस्थानांतही मराठ्यांची सत्ता स्थापित करून मुसलमानांचा बीमोड करावा, ह्या इराद्याने मल्हारराव व बाजीरावाचा भाऊ चिमणाजी अप्पा हे मोहिमेस निघाले. ती वेळ त्यांच्या हेतूच्या सिद्धीस फार अनुकूल होतो. मोगल बादशाहा नेहमी विलासांत निमग्न असे. त्याच्या जुलनी अमलामुळे त्याची हिंदुजा त्याजवर अत्यंत नाखूष होती. व