पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ || की रोहिंग्या काय मुखेंदुलीन ।। ऐशा नया सुंदर मौल्यवान || || ढगांतुनी की बुरख्यांमधून || दृष्टीस केव्हां पडतात छान ।।१२।। ॥ कंठांतली आभरणप्रभा जी ॥ फांके सभोवार विशाल तेजी ॥ ।। ती भासवी काय खळेंच साचें ।। लोग सभोती मुखचंद्रम्याचे ॥ १३ ॥ ॥ जयांवरी कांचन कंकणांचे ॥ तेज स्फुरे, वामकरां बुजाचे ॥ ॥ त्या अंगुल्यांभीतर की दलांत ॥ की खेळतो भृंगव नेत्र कांत ॥ १४ ॥ ॥ कीं आकळाया गज कामरूप || त्या साखळ्या रन्यपदी अमूप || ॥ आहेत, हे तो छुमछुम ऐसा ॥ गर्तमधी नूपुरशद्व तैसा ॥१५॥ ॥ समाज ऐसे युक्तीजनांचे ॥ होते जियें शोभत रम्य साचे ॥ ॥ तारुण्यसंपन्न तिथे अनेक || अत्यंत रंगेल मिळून लोक ॥ १६ ॥ ॥ कोणी फुले सुंगित शांततेत | कोणी मिशांला उगे पीळ देत ॥ ॥ बोळे कुणी उत्तम अत्तराचे ॥ स्थापीत नीट श्रवणी स्वतांचे ॥१७॥ ॥ स्त्रियांकडे फेंकित वक्रदृष्टि ॥ वर्णील ती हो कवि काय तुष्टे ॥ ॥ टीका स्वरूपावरती करीत ॥ होते तदा काळ सुखे क्रमीत ॥ १८ ॥ ॥ पाहूनि तांबोळिण फाकडीशी ॥ किती तसे फक्कड लोक हौशी ॥ ॥ मिळूनि, घेऊाने विडे करीं, ते ॥ चैनीमधीं हांसत खात होते ॥१९॥ ॥ स्वीयप्रिया रंजविण्या कितीक || तैसे विलासी जन छानछूक ॥ ॥ मेवा मिठाई खणपातळांत ॥ त्या त्या दुकानांमधिं घेत होते ॥ २० ॥ ॥ थाटांत मौजेस्तव ह्या ठिकाणी ॥ अविधही माजुमिच्या दुकानीं ॥ || होते मिळाले कितिएक तेथें | डोळ्यांत सुर्मा चढवीत होते ॥२१॥ ।। जीं जाहलीं चिंब भिजूनि तैली | वस्त्रे शरीरी अशि किट्ट काळीं ॥ || असून, कंठांत कपर्दिकेच्या ॥ आहेत माळा बहुशा जयांच्या ॥ २२ ॥ ॥ कपर्दिका ज्यांस बहूत लग्न || काळ्या अशा त्या परड्या मलीन ॥ ॥ जे सोडिती श्वासच धूर तोंडें । ऐसे प्रदीप्तानन पोत जाडे ।। २३ ॥