पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" ४५ || ही कल्पना होळकराग्रणीची || उत्कृष्ट भारीच अपूर्व साची || ॥ घेऊनियां हा बड़गा सपाटा | मी सिद्ध देण्यास असें रपाटा ॥ ७३ ॥ ॥ ह्या पूत मेळयामधिं गोवधातें ॥ करूाने जो म्लेंच्छ अधर्म तेथें ॥ ॥ बा ! क्रूरचित्तै करितात त्यांचा ॥ हा सूड उत्कृष्ट सुयुक्त साचा ॥७४॥ ॥ हा सिद्ध शिंदा लढण्यास बंदा ॥ मुष्टिप्रहारे कुटण्या अविधां ॥ ॥ हरूनि त्यांचे समरांत कुरें !! देतों पहा मी उडवोनि धुर्रे ॥ ७५ ॥ ॥ पवार सावेश फुगूनि दंडीं || बोले " कसे बंद तुटोने, बंडी ॥ ॥ माझी कशी होय ढिली पहा ही । आंगीं भरे त्वेष असाच कांहीं७६ ॥ ॥ चला लुटूं यासमयींच मेळा || तूं मशीदींतचि सूकराला ॥ || होईल ही गम्मत एक थोर ॥ उडेल लोकतिहि भौज फार ॥ ७७ ॥ ॥ घेऊनेि हस्ती तरवार घेर || मी सिद्ध युद्धास असे पवार ॥ ॥ लांडेच मैंडे जगु होम हुंडीं ॥ जाळोनि मी तोषवितच चंडी ॥ ७८ ॥ ॥ मल्हारजी ज्यावर फार राजी ॥ कोणी असा वीर तिथे तुकोजी ॥ ॥ होता, पुढे सर्तुनि तो ह्मगाला ॥ 'जाण्यास आज्ञा मज द्या व नाल ॥७९॥ ॥ करूनियां पारध सूकराची ॥ मी आणितों ह्यासमयींच साची ॥ ॥ दोर्दंडयुग्मामधिं ह्याच किंवा ॥ मी आणि त्यास जिवंत एव्हां ॥८०॥ ॥ वीरोक्ति होतांच अशा अचाट || आवेशसिंधू चिडुनी अफाट || ॥ माजोनियां काय तुफान साच ॥ उच्चारिती ते रणशब्द उच्च |८१॥ ॥ दणाणुनीर्या नभ जाय तेणें ॥ ये पेशवा तेथ तदा त्वरेनें ॥ ॥ त्या सांगतां हा कट, तो सहर्ष ॥ दे त्यां स्वतांच्या अनुमोदनास ॥८२॥ ॥ भाग पांचवा समाप्त ॥

  • हा मल्हाररावाच्या फार प्रीतीतील तुकोजी होळकर योद्धा होय. हा मल्हाररावाच्या संख्या चुलत भावाचा मुलगा होता असे होळकरांच्या वंशा- वळीच्या झाडावरून दिसते, ह्यालाच पुढे अहिल्याबाईनें दौलतीचा कारभार सांगून मुख्य सेनापती केले,