पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४. ॥ की भारती वीरच अन्य ऐसे ॥ योद्धे दुजेही असतां बहू || ॥ आहे मराठ्यांस अशस्य काय ? ॥ पदार्थ त्यां साहस काय होय ! । ६२॥ ॥ करीत तो सादतखान गिल्ला ॥ लोकीं वृथा जंबुकवल्गनेला ॥ ॥ करीत आहे भिरवीत डौल ॥ करीत निंदा अमुची खुशाल ॥ ६३ ॥ ॥ त्याच्याच नाकावर काय लत्ता ॥ परंतु दिल्लीपतिच्याहि आतां ॥ ॥ नाकावरी लात हणूनि, टोला ॥ मारूनि जेव्हां लुटं हाच मेळा | ६४ ॥ ॥ तेव्हां तयांची बहु वल्गना ती ॥ संपूनि ते होतिल सुन्न चित्तीं ॥ ॥ कळेल तेव्हांच पहा तयांला ॥ मल्हारजी काय रणीं पळाला ॥ ६५॥ ॥ मल्हारजी मी जरि नांवचा हो ॥ तरी पहा म्लेच्छ गलिच्छ हे हो ॥ ॥ लत्ताप्रहारी तुडवून, सूड ॥ घेईन, त्यांची जिरवूनि खेोड ॥ ६६ ॥ ॥ हे क्षुद्र हे मोगल कःपदार्थ ।। हे झुंजय्या काय रंणां समर्थ ॥ ॥ पाणी असे काय तयांत साचें ? ॥ धिःकार सत्तेस असो त्यांचे ! | ६७ ॥ ॥ ठोकोनियां दंड, भिशीस पीळ || देऊनि मी ह्यासमयीं खुशाल ॥ || देखा प्रतिज्ञा करितों तियेस ॥ हा दीप तो चंद्रच साक्ष खास ॥ ६८ ॥ ॥ कोणी हुमायून अजा निपजा ॥ जो होउनी जाय तदीय राजा ॥ ॥ त्याच्याच देखा करेसमीप | मी सूकराचे शवची कुरूप ॥ ६९ ॥ ॥ टांगानि देत, जर अन्यथा ही ॥ हो मत्प्रतिज्ञा, कथितों से ही ॥ ॥ हा घोर मल्ल बहूत उग्र || माझ्याच वक्षांत शिरेल शीघ्र " ॥७०॥ ॥ युः ॥ ॥ मल्हारजीहै!ळकराग्रणीची ॥ ऐशी प्रतिज्ञा जणु अर्जुनाची ॥ ॥ ऐकोनि शिंदे शरिरीं स्फूरून । बोले ' प्रतिज्ञा खरि ही भयाण ॥ ७१ ॥ ॥ ही शोभते होळकराप्रतीच ॥ मल्हारजीवीरच तीस साच ॥ || नेईल सिद्धीस, न त शंका || तो गाजतो वीर असाच बाका । ७२ ।।