पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ दिल्लीवरी ही मग पेशव्याची || स्वारी निघाली रणशूर साची ॥ ॥संपूर्णभागी पसरीत द । ती येउनीयां भिडला समीप ॥५५॥ ॥ समीपची येथुनि कालिकेचा ॥ * मेळा भरे ह्यासमयीं सुखाचा ॥ ॥ मल्हारजीचे मानं त्याक्षणी ये ॥ की तो लुटावा लवलाहि शौर्ये ॥५६॥ || पवारशिप्रभृतिप्रवीरां । पाचारुनीयाँ अपुल्या विचारा ॥ 11 सांगूनि, सोत्साहमनें तयांला ।। मल्हारजीवीर असें ह्मणाला ॥५७॥ ॥ ‘हे वीर हो! हा बहु थोर मेळा || लुटूं जरी आपण ह्या घडीला ॥ 11 होईल हे धाडस एक ऐसें || गातील त्या मित्र रिपूहि तैसें ॥ ५८ ॥ 1। तेणें मराठे गमतील नित्य | सर्वांप्रती अद्भुत वीर सत्य || 14 हे वीर बा ! मानव की सुरांश । राहील ही भ्रांति सदा जनांस।५९॥ ॥ आतां असे गोष्ट बहू खरी ही ।। मेळ्यांत ह्या म्लेंच्छ महा समूहीं ॥ ॥ सशत्र आहेत, तसे समीप || अविधसेना हि असेल मोप ।। ६०॥ ॥ परंतु शिंद्यासम भीष्मरूनी ।। वीरांमधीं वीर महाप्रतापी ॥ ॥ योद्धा पवारासम अद्वितीय ॥ भीमस्वरूपी असतां सहाय ॥ ६१ ॥

  • मालकमसाहेबांच्या इतिहासाचे मराठी तरजुम्यांत ह्या मेळयाच्या सं- बंधानें असें लिहिलें आहे. “दिल्ली शहरापासून सात आठ कोसांच्या टप्या- च्या आंत, मराठ्या सरदारांनीं कालिका भवानीचा प्रसिद्ध मेळा लुटला. त्या सरदारांत मल्हारराव होता. मोठी छाती करून केलेल्या या प्रसिद्ध स्वा- रीच्या प्रसंगीं, मराठ्यांनी, हुमायूनबादशाहाच्या कबरेजवळच्या पुलावर, डुक्कर मारून टांगून, मुसलमानी सत्तेचा धि:कार प्रदर्शित केला. यावेळी त्यांस पुष्कळ लूट सांपडली. यापूर्वी कांहीं महिने, बादशाहाच्या लष्करापासून मल्हाराव पराजय पावला होता, त्याचा पुरतेपणी मोबदला होई इतकें द्रव्य व इतका नांवलौकिक, वर लिहिलेल्या प्रसंगी त्याणें संपादिला". मल्हारर. व हुआवांत लूट करीत असतां मोंगलांची फार मोठी फौज चालून आली ह्मणून तो आपल्या थोडक्या लोकांनिशीं यमुनानदी उतरून मार्गे सुखरूप लोटला, तोच हा मागील उताऱ्यांतील बादशाहाच्या लष्करापासून झालेला मल्हाररावाचा पराजय होय. ह्याचें वर्णन पूर्वी कवितेत आलेच आहे.