पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ ॥ एके दिनी होळकरप्रवीर || एकाग्रचित्तास करूनि फार ॥ करीत पूंजा असतां हराची ॥। ये थोर सेना बहु मोगलांची ॥४४॥ ॥ ती हे मराठे बहु अव्यवस्थ || देखोनियां अल्प तसे बहूतं ॥ ॥ तुटून त्यांच्यावर त्याक्षणीच ॥ पंडे जणो काय महामरीच ||४५॥ ॥ क्षणैक घोटाळुनियां स्वचित्तीं ॥ योद्धे मराठे मग हे स्वहस्तीं ॥ ॥ धरूनि शस्त्रांस करून चाल ॥ ते झुंजती शत्रुशि फार वेळ ॥४६ ॥ ॥ प्रचंड होतें रिपुसैन्य तेणें ।। मल्हारजीवीर तदा त्वरेनें ॥ ॥ घेऊनि हे अल्प सर्वे मराठे ॥ तेथूनि मागें सुखरूप लोटे ॥४७॥ ॥ ह्या नंतरी गर्व करीत शुष्क ॥ सेनापती सादतखान* मूर्ख ॥ ॥ ह्या मोंगलांसार्ध पुढे न येतां ॥ आग्राकडे जाय सहर्ष आतां ॥ ४८ ॥ ॥ तो बादशाहास बहूत थाटे || लिहूनि धाडी मग की " मराठे ॥ ॥ मीं संगरीं ठोक्कुनि काढियेलें । मीं चंबळापारच त्यांस केलें " ॥४९॥ ॥ चित्तास आल्हादक फार साची ॥ ऐशी सुवार्ता पसरे जयाची ॥ ॥ होऊाने सेनापतिची प्रशंसा || दिल्लीत हो हर्षच हर्ष तैसा ॥५०॥ ॥ त्या पेशव्याच्या वकिला निरोप || देतां वजीरें सहसा सदर्प ॥ ॥ निघूनि आग्र्यांतुनि पेशव्याला ॥ ॥ हें मौर्य दिल्लीपतिचें बघूनी ॥ ॥ मल्हारजी आदिकरून लोकीं ।। तौं सत्वरी येउनियां मिळाला ॥५१॥ साश्चर्य संताप मनीं रिघूनी ॥ श्रीमंत तेव्हां वदले असे कीं ॥५२॥ ॥ " योद्ध मराठे बलशौर्यराशी ।। आहेत सध्यां यवनप्रदेशीं ॥ ॥ स्वेच्छाविहारी जणु की उदंड || विशाल डोहीं मगर प्रचंड ।। ५३ ।। ॥ म्लेच्छांस ही गोष्ट कळेल तेव्हां ।। दिल्ली मराठे लुटतील जेव्हां ॥ ॥ हो चंबळापार न ते मराठे || कळेल हैं त्यां बसतांच से|टे ॥५४॥ "

  • ह्या सेनापतीचें नांव मालकमसाहेबाने आपल्या मध्य हदुस्थानाच्या इतिहासांत 'बालमुल्क' असे दिले आहे. सादतखान अयोध्येचा सुभेदार होता.