पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ ॥ ह्या माळव्याचे विजयांत फार ।। मल्हारजी होळकरप्रवीर ॥ ॥ स्वशौर्य दावी तशि बुद्धिमत्ता । तोची करी स्थापित हिंदुसत्ता ॥ ३३ ॥ ॥ श्रीमंत चित्तीं ह्मणुनी प्रसन्न ।। होऊाने त्या फारच गौरवून ॥ ॥ इंदूरच्या त्या प्रगण्यासहीत || देती जहागीर तया बहूत ॥३४॥ ॥ महारजी नंतर इंदुरीं या ।। स्वकीय सेनेप्रत ठेवुनीयां ॥ ॥ पाहोनि डोळां स्थल सोइचें तें ।। ठाणे स्वतांचे करि मुख्य त्यार्ते ॥३५॥ ॥ श्रीमंत ह्यानंतर तेथुनीयां ॥ निवनि, सैन्यासह ठेवुनीयां ॥ ॥ शिंद्यास होळकराग्रणीस || मार्गे, रिघे सत्वर दक्षिणेस ॥ ३६ ॥ ॥ निनाने गेल्यावर पेशवा तो || प्रांतांतुनी ह्या कर काळिचा तो ॥ ॥ मल्हारजी वीरजनांत वर्य ॥ गोळा करी की रस काय सूर्य ॥ ३७ ॥ ॥ दिल्लींतुनी सैन्य पुढे त्वरेने * ॥ ये जिंकण्या त्याप्रत आढ्यते ॥ ॥ परंतु तो होळकराग्रणीचा || प्रताप देखोनि असह्य साचा ॥३८॥ ॥ जणो दिवाभीतच होउनी तें ॥ दाने मार्गे भयभीत चित्तें ॥ ॥ खोट्याच आत्मस्तुतितें कराया ॥ जैसें न एक्यास्थळ इंद्रचाप ॥ ॥ येथेंच गाजूनि असे, न ऐसें ॥ ॥ वेगें भराऱ्या गरुडासमान ॥ । फिरून दिल्लीस रिघे जगाया ॥ ३९ ॥ नभीं, तसा होळकरप्रताप ॥ अन्यत्रही तो बहुसा प्रकाशे ॥४०॥ मारीत शत्रूंस करीत दीन || ॥ तो गुर्जरींही शिरुनी, जितून ॥ ये माळवीं तेथुनियां फिरून ॥४१॥ ॥ जें मागणें बादशहास केलें । तें पेशव्यातें नच लब्ध झालें ॥ ॥ ह्मणून तो घेउनि सैन्य वेगीं ॥। ये नर्मदा लंबुनि ह्याप्रसंगीं ॥४२॥ ॥ मल्हारजी आणि दुजे प्रवीर || घेऊने कांहा मग लोक शूर ॥ ॥ उल्लंघनीयां यमुनानदीस || गेले दुआबांत लुटावयास ॥४३॥

  • ह्या सैन्यावर खानडौराण वजीर याचा भाऊ मुझपरखान हा मुख्य होता. मुझपरखान सरोज पर्यंतच येऊन मांगें फिरला; आणि त्याने दिल्लीच्या लो- कांस लटकेच समजाविलें कीं आपण मोठा पराक्रम केला.