पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० ॥ कांहींच दृष्टी न पडे जराही || झाली कशी गे ! कुदशा तुझी ही || ॥ कोणीच कां गे! प्रिय हिंदुभर्ता । मिळे न तूतें तव दुः खहती ॥ २३ ॥ ॥ आतां अशा उज्जयिनीपुरीस || गांडूनि हां हां ह्मणतां तिथेस ॥ ॥ करूनि दुःखांतुन मुक्त नित्य ॥ मल्हारजी हो कृतकृत्य सत्य । २४। ॥ जो पेशव्यांचा ध्वज ऊर्ध्वभागीं ॥ येथे खुले, तो जणु ह्या प्रसंगी ॥ ॥ तिच्या शिरींच्या पदराप्रमाणें । लोकीं विराजे बहु आदरानें ॥ २५ ॥ ॥ मल्हारजी वीर असा प्रताप || करीत येथें असतां अनूप ॥ ॥ पवार आणी चिमणाजिपंत ।। त्यातें मिळाले मग माळव्यांत ॥२६॥ ॥ हा विप्र योद्धा मग शत्रू लीन ॥ करीत युद्ध असतां लहून ॥ ॥ बलाढ्य सिंद्यासह सैन्ययुक्त । श्रीमंतही मागुनि येत तेथ ॥ २७ ॥ ॥ शौर्यस्तुती होळकराग्रणीची ॥ हो पेशव्यापास बहूत साची ॥ ॥ श्रीमंत आतां बहु सैन्ययुक्त ॥ जाती पुढे बंगवमर्दनार्थ ॥ २८ ॥ ॥ बुंदेलखंडाधिप तो सुशील || ह्या बंगषे पीड्डाने छत्रसाल ॥ ॥ देशामधीं जो जणु दैत्य होता । श्रीमंत त्या वेदिति शीघ्र आतां ।। २९॥ ॥ उपासमार्रे बहु घाबरोनी । युद्धों कदा तोंड न दाखवोनी ॥ ॥ हे म्लेंच्छ शेंदाडशिपाइ साच || चोरूनि मागें पकुंलागतांच॥३०॥ ॥ सिंद्यासवें होळकरप्रवीर ।। मागें तयांच्या वणवाच थोर ॥ ॥ की लागुनी भाजुनियां तयांस || देशांतुनी शीघ्र पिटाळि त्यांस ॥ ३१ ॥ ॥ करोनियां निर्भय छत्रसाल ॥ पावोनियां मानधनां, सुशील ॥ ॥ श्रीमंत तेथून निघून वेगें ।। जिंकी पुढे मालवदेश आंगें ॥३२॥

  • दयाबहादूर रणभूमीवर पतन पावल्यावर त्याचे जाग्यावर बादशहानें महं- मदखान बंगष हा नवा मुसलमान अधिकारी नेमिला होता. प्रथमतः त्याची स्वारी बुंदेलखंडावर येऊन थडकली. ह्या अरिष्टांतून आपली मुक्तता व्हावी ह्मणून बुंदेलखंडाच्या छत्रसालराजानें बाजीराव पेशव्याची कुमक मागितली; बाजीरावानें स्वतः येऊन त्याची कुमक केली; व बंगषाचा पूर्ण पराभव केला.