पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९ ॥ रत्ने नऊ पंडित रूप मोठीं ॥ जी एकदां लेवुनियां स्वकंठीं ॥ ॥ अतुल्य शोभा मिरवीत लोकी ॥ विराजली अन्य सरस्वती कीं । ११ । ॥ तिच्यांत आतां हटवादि काजी ते मौलवी क्रूरपणास राजी ॥ ॥ "जे हिंदुचे ग्रंथ अमोल सारे ।। अर्वाच्य ते" हैं मत सांगणारे ॥ १२ ॥ ॥ ऐसे शिखानष्ट बहूत नष्ट | अनेक शंखासुर काय दुष्ट ॥ ॥ होऊनि, कार्खेत कुराण पीठें ॥ मारूनि मार्गी फिरतात थाटै ॥ १३॥ ॥ उडूनि सर्वत्र गुलाल रंग || पूजा अनंगास मिळूनि सांग ॥ ॥ हर्षांमधी मंगल गायनांत ॥ झाले वसंतोत्सव रम्य जींत ॥ २४ ॥ ॥ दिसूनि सर्वत्र फकीर आतां ।। रिघनि कर्णी हयदोस वार्ता ॥ ॥ शोकामधीं तींत रडारडीचे ।। होती पहा उत्सव ताबुतांचे ॥ १५ ॥ ॥ श्री कालीदासादि महाकवींचीं ।। होतीं जयीं सुंदर नाटकेंची ॥ ॥ आतां पहा तींत असभ्यतेचे ॥ होती तमाशे चिर भांड यांचे ॥ १६ ॥ ॥ ऐशी दशा उज्जयिनी पुरीची || देवूनि दु: खास्पद फार साची ॥ ॥ कोणा प्रतीही अणखीं स्वभावें ।। वाटे असे तीस तदा पुसावें ॥ १७ ॥ ॥ " विस्तार्ण भारी नभ चुंबिणारे ॥ चित्तास भांबावुनि टाकणारे ॥ ॥ कौशल्य तेथें बहु भव्य आंगें ॥ गेले तुझे सौध असे कुठें गे! ॥१८॥ ॥ रम्यांगना रम्य अशा वसंतीं ॥ घेऊाने पंखे बहु रम्य हातीं ॥ ॥ घालीत वारा अपुल्या प्रियांस ॥ बैसूनियां ज्यांवर चांदण्यांत ।। || करीत श्रृंगारिक भाषणांस ॥ १९॥ शोभा जया उज्वल दे बहूत ॥ ॥ ऐशा विशालाकृति चंद्रशाला | गेल्या कुठे गे ! तव ह्या घडीला ॥ २० ॥ ॥ युग्म ॥ ॥ जे पांच रम्याकृति कामबाण || आम्रादि ते ज्यांत बहू खुलून ॥ ॥ तो भृंगगुंजारव गोड भारी ।। तो कोकिलांचा ध्वनि मोहकारी । २१ । ॥ भरोनियां ज्यांत बहू सभोंतीं ।। ज्यां नंदनाची सर येत होती ॥ ॥ उद्यान ते फारच सौख्यदाते ।। गेले कुठे गे ! तव सांग मातें ।। २२।। ॥ युग्म ॥