पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ ॥ भाग पांचवा ॥ ॥ * भोजाधिपत्यें बहु एकदां जे ॥ अखंड सौभाग्यवती विराजे ॥ ॥ जी एकदां पंडितरूपहंसां ॥ दे मानसातुल्य बहूत हर्षा ॥ १ ॥ ॥ म्लेच्छाधिकारें जणु दीनदासी ॥ जी भोगिते सांप्रत दुःखराशी ॥ ॥ जी म्लेंच्छतापें बहु शुष्क आतां ॥ ये जींत ऐकूं खलकाकवाती ॥ २ ॥ ॥ त्या ख्यातधारानगरीत आतां ॥ मल्हारजी म्लेंच्छविनाशकर्ता ॥ ॥ प्रवेशुनीयां अपुल्या यशाचा ॥ झेंडा उभारी अविनाशि साचा ॥ ३ ॥ ॥ पुरींत यानंतर पेशव्याची ॥ द्वाही त्वरें तो फिरवी सुखाची ॥ ॥ स्वातंत्र्यदाने जणु कुंकुमनें ॥ करी तिचें सोज्वळ भाळ मानें ॥ ४ ॥ ॥ बुळे विठोजीस पुरीमधीं या ॥ कामावरी सांप्रत ठेवुनीयां ॥ ॥ मल्हारजी विक्रमराजधानी ॥ करावया मुक्त निघे तिथूनी ॥ ५ ॥ ॥ ही राजधानी नृपविक्रमाची || किती स्तवावी महती तियेची ! ॥ ॥ तैसें तिचें दुः खहि ह्याघडीचें ॥ किती कथावें बहु घोर साचें ॥ ६ ॥ ॥ जी विक्रमानें नृपविक्रमाचे ॥ हो एकदां भूषण दिव्य भूचें ॥ ॥ ती म्लेंच्छसत्तेत असे क्षणीं या ॥ की रत्न मातींत अनर्घ्य वाया ॥७॥ ॥ जिच्या प्रभावास भिऊनि फार || देशांतरीचे नृप थोर थोर ॥ ॥ येतीच पूर्वी करभार देण्या ॥ मागून तैसें अभयास घेण्या ॥ ८ ॥ ॥ तिच्या शिरीं दुः सह दुः खदाता | अविंध यांचा करभार आतां ॥ ॥ असून, वांकूनि तिचा गळाच ॥ अत्यंत आहे भयभीत तीच ॥ ९॥ ॥ विद्वज्जनांची जननी जणो जी ॥ कीं त्यांस माहेरघरापरी जी ।। ॥ असून, पूर्वी चिरकाल जींत ॥ ज्ञान प्रकाशे जणु मूर्तिमंत ॥ १० ॥

  • तरळा खेढ्यावरची लढाई झाल्यावर मल्हाररावानें धार व उज्जन हीं . दोन शहरें काबीज केली असें मराठी बखरींत लिहिलें आहे.