पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काव्यांतील कथानकाचा सारांश. भाग १ लाः--- मल्हारराव निरानदोचे कांठी होळमुरूम या गांवों जन्मला. त्याच्या बापाचें नांव खंडोज चौगुले अर्से होतें. मल्हारराव लहान असतांच खंडोजी निवर्तला. पुढें मल्हाररावाचे आईचें व तिच्या नवऱ्याच्या भाउबंदांचें पटेना. ह्मणून ती मुलासह खानदेशांत तळोदें या गांवी आपला भाऊ नारायणराव बारगळ याचे घरीं जाऊन राहिली. नारायणरावाने आपल्या भा- चास मेंढ्या चारण्याचे काम लावून दिलें. झाडाचे छायेंत दगडावर मल्हारराव निजला नागार्ने येऊन आपली फणा त्याचे मस्तकावरं एके दिवशीं रानांत असतां वारुळांतून धरिली . त्यानंतर एके दिवशी नारायणरावांचे स्वप्नांत जेजुरीचा खंडोबा येऊन त्याने 66 तुझा भाचा राज्यपद पावेल " असें सांगितलें. ह्यावरून नाराय- रावानें मल्हारजीस मेंढ्या चारण्याचे कामांतून काढून शिपाथिग- रीचे कामांत घातलें. ह्या भाग २ रा :--- मल्हारजीस दांड, पट्टा, तिरंदाजी, वगैरे शूरास आवश्यक ज्या ज्या निरनिराळ्या विद्या, त्या प्राप्त झाल्या. वेळीं मल्हारजी बराच प्रौढ वयाचा झाला हें पाहून नारायणरावार्ने त्यास, बाळाजी विश्वनाथ सैन्यासह दिल्लीस सय्यद बंधूंचे साह्यार्थ जात होता, त्याजबरोबर जाण्यास परवानगी दिली. ह्या मोहि- मेंत बाळाजीचा मुलगा बाजीराव याचा मल्हाररावाशीं स्नेह जमला. दिल्लीहून परतल्यावर मल्हारजी पुन्हां खानदेशांत आपले मामाचे घरी गेला.