पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ ॥ वेळेवरी वेतन लभ्य हो न ॥ उपासमारा पडतो ह्मणून ॥ ॥ ह्मणून कंटाळुन जीवितास ॥ कितीक मेले लगुनी निराश ॥ १२२ ॥ ॥ ' आणूं मराठे लुगडीं धुण्यास ॥ तरीच दावूं मुख है तुह्मांस' ॥ ॥ बोलोनि ऐसें अपुल्या सख्यांतें । कितीक हो प्राप्त रणांत जे, ते १२३ ॥ ॥ ' योद्धे मराठे अपुल्याप्रतीच ।। धुण्यास आतां लुगडीं खरेंच ॥ ॥ नेतील ' है पाहुनि, लाजुनीयां । बुध्या रणी हो मृत झुंजुनीयां ।। १२४ ।। ॥ युग्म ॥ ॥ मुख्याधिकारी बहुपक्षपाती । स्वतांप्रती नीट न वागवीती ॥ ॥ कधीं श्रमाचें फल लब्ध हो न । कितीक गेले पळुनी ह्मणून ॥ १२५ ॥ ॥ योद्धे मराठेहि कितीक नाना || पुढे पुढे सर्मुनि झुंजतांनां ॥ ॥ कामास आले समरांगणांत । घायाळ हो फार कितीक त्यांत । १२६ । ॥ संपादुनीयां जय थोर ऐसा || करीत आनंद जनीं बहूसा ॥ ॥ मल्हारजी नंतर सैन्यभारा ॥ घेऊन तेथून निघे पुढारा ॥१२७॥ ॥ चवथा सर्ग समाप्त. ॥