पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ ॥ तद्भल्लसामर्थ्य असें बघोनी ।। तो म्लेच्छपक्षीय बहूत मानी ॥ ॥ दयाबहादूर समीप तेथ ॥ संतप्त चित्तांत असे बहूत ॥ ११० ॥ ॥ फोडीत मोठ्या डुरक्या गंभीर ॥ भूमी खुरानें उकरति फार ॥ ॥ निश्वास सोडीत बहूत थोर ॥ पृष्टावरी ताडित पुच्छभार ।। १.११ ॥ ॥ कधीं कधीं थोर वसंड पुष्ट ॥ थरावीत स्वमनांत रुष्ट ॥ ॥ उभा जसा सांड तसाच आतां । दयाबयादूर दिसे समस्तां ॥ ११२ ॥ ॥ युग्म ॥ ॥ मल्हारजी दारुण सिंहनाद ॥ करीत, होऊनि कृतांत शुद्ध ॥ ॥ सर्वत्र भीती पसरीत धाक ॥ धांवे त्वरें त्यावरती विशंक ॥ ११३ ॥ ॥ दयाबहादूरहि वीर जंगी ॥ धांवे पुढे सर्मुनि ह्या प्रसंगी ॥ ॥ ते भूस्थ दोघे मग तप्तचित्त ।। होती त्वरें द्वंद्वरणी प्रवृत्त ॥ ११४ ॥ ॥ दयाबहादूर लगेंच रोषीं ॥ भिडोनियां होळकराग्रणीशीं ॥ ॥ पाडावया त्या बहु देई झोले ॥ परंतु हा काय तयास तोले ?॥११५॥ ॰॥ धरौौने शेंडी, असडोनि मुंडी ॥ त्याची गचांडी धरुनी, घमंडी ॥ ॥ हरोनि, गुत्ता मुखिं त्या प्रमत्ता । देऊनि वक्षीं तशि एक लत्ता । ११६ । ॥ मल्हारजीवीर बलाढ्यमल्ल ॥ सुदर्शनातुल्य अजिंक्यभल्ल ॥ ॥ सर्वप्रदेशीं भ्रमवीत आतां ॥ की होउनी कृष्णच युद्धकर्ता ॥ ११७ ॥ घोळोनि ऐसा जणु वक्रदंत ॥ कुस्तीत त्याचे करिव दंत ॥ ॥ विध्वंसुनी तो शिशुपाल काय । खरा स्वभूचा शिशुपाल होय । ११८ | ॥ कीं कृष्ण कंसांतक भीतिदाता ॥ की भीम दुःशासननाशकर्ता ॥ ॥ दयाबहादूरविनाशकर्ता ॥ मल्हारजीवीर तसाच आतां ॥ ११९ ॥ ॥ दृष्टीसमोर स्थित देखनीयां ॥ पांचावरी धारण बैसुनीयां ॥ ॥ अविंध सारे अवशिष्ट लीन ॥ पळोनि गेले समरामधून ॥ १२० ॥ ॥ अविधपक्षीय कितीक थोर ॥ युद्धांत ह्या शौर्य करून फार ॥ ॥ झाले गतप्राण, कितीक मेले ॥ उगींच ताठा मिरवीत लिं ॥ १२१ ॥