पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५ ॥ ते वाघ नामापरि वर्तणारे || वाघासही मारुन टाकणारे ॥ ॥ ते वाघमारे जणु भीमशैौर्ये । ॥ प्रख्यात ते बारगळ प्रतापें । ॥ असे असे घेउनि थोर वीर ॥ ते गाजलेले फणसे स्ववीर्ये ॥१०३॥ दुर्जेय ते भागवत स्वदपै ॥ उभा असे होळकरप्रवीर ।। १०४ H ॥ उभा असे चोपित शत्रुलाग ॥ अविध विध्वंसित अग्रभागी ॥ । ज्या शत्रुच्या येति अखंड झुंडी ॥ चालोनियां, त्यांस उदंड खंडी। १०५ ॥ ॥ घडोनि थोबाड, धरोनि कल्ले | दाबोनि कंठास करें, स्वभलै ॥ ॥ फोडी रिपूंचीं रणिं टाळकींच । कीं ॥ कीं मृत्युचें तीक्ष्ण नख प्रचंड । नारळें मेखसुनें खरींच ॥१०६॥ तद्बल्ल ऐसा विजयी अखंड ॥ ॥ करी रिपूंचीं नरडीं दुखंड ॥ प्राशी सदा रक्त, भरून तोंड ॥१०७॥ ॥ ह्मणून आरक्त तदीय भल्ल || नागांतकाची जणु चोंच लाल ॥ ॥ कीं होउनीं, नागच जे अविध ॥ त्यांचीं विदारी उदरें सबंध ॥ १०८ ॥ ॥ संसप्तकांचा गण की प्रमत्त ॥ हे म्लेच्छपक्षीय रणांगणस्थ ॥ ॥ मल्हारजी अर्जुन की द्वितीय ।। कापी जसा तो कडबाच काय ॥ १०९ ॥ (वाघमारे) वाघमाला पूर्वी महत्पूर महाली जहागीर होती; परंतु सध्या ते अप्रसिद्ध आहेत. (फणसे) फणसे है इंदुरांत मोठे प्रतिष्ठित मानकरी आहेत. ह्यांर्चे वडील घर दक्षिणेंत निफाडगांवी आहे. सांप्रत इंदुरांत असणारे फणसे हे श्रीमंत महाराज तुकोजीराव होळकर यांचे सख्खे शालक आहेत. चालूं पूर्वशतका- मध्ये ह्या घराण्यांतल्या राजाभाऊ फणसे नामक पुरुषाने होळकरशाई बरीच हालविली. [ बारगळ. ] इंदूरवासी बारगळ सध्यां अप्रसिद्ध असून गरिबीत आहेत. अलीकडे तळोद्याचे मुख्य बारगळ घराणें व राजकीय होळकर घराणें ह्यांमध्यें शरीरसंबंध झाल्याने तळोद्याचें बारगळ सांप्रत इंदुरांत जहागीरदारांत मोडतात. गावढे व भागवत हे इंदुरांत खाऊन पिऊन चांगले सुखी आहेत; व ह्यांची गणना मानकऱ्यांत आहे.