पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ ॥ बुळे विठोजी बलभीमरूप ॥ मल्हारजीदाशरथी समीप ॥ ॥ ते लांबहाते रिपुगर्वहर्ते । ते गावढे संगरकीर्तिकर्ते ॥ १०२ ॥

  • बुळे, लांभाते, गावढे, वाघ, वाघमारे, फणसे, बारगळ, आणि भागवत, ह्रीं सर्व घराणा धनगरज्ञातीचीं आहेत. ह्या घराण्यांविषयीं जी थोडीबहुत माहिती ऐकून ठाऊक आहे ती थोडक्यांत पुढे दिली आहे.

( बुळे) इंदुरांत बुळयांचें घराणें मोठें प्रसिद्ध व पहिल्या प्रतीचें आहे. त्या घराण्यांतील पुरुषच काय पण बायकाही शूर होत्या अशी प्रख्याति आहे. यशवंतराव महाराज होळकर ह्यांची कन्या श्रीमंत भीमाबाईसाहेब बुळे ह्यांची शिपाईगिरीबद्दल सर्वत्र मोठी ख्याति होती असे जुने लोक सांप्रत नेहमीं सांगतात. ह्या घराण्यास कोटा वगैरे महाल पूर्वी जहागीर होते. सांप्रत रेसिडेन्सी मार्फत ठेवाचें व्याज बरेंच येतें त्यावर ह्या घराण्याचा खर्च चालतो. [ लांभाते ] लांभात्यांचें घराणें पूर्वी कार मोठें होतें म्हणून सांगतात. सांप्रत द्या घराण्याकडे जिरापूर माचलपूर महालीं कांहीं जमीन वंशपरंपरेनें जहागीर आहे. थोरले तुकोजीराव होळकर गादीवर असतां हें घराणें चांगले भरभराटीत असून त्यांतील पुरुषही मोठे गाजीमर्द होते असें पुढील रांगडी पद्यावरून दिसून येईल. " ॥ परगढ़ परगड घोरा दवढे ऊटाकी लड साजे ॥ ॥ जालमसिंग की पाटणपर लांभातेके गोळे गाजे ॥ ॥ जद कोटा बुंदी ऊबाऊबा धूजे ॥ ॥ जद उदेपुर थरथरे || होळकर सरकारसे भायबकरे ॥ ॥ तकुलारे गड गाजिया || रामपुरा होळकरका बाजया ॥ ॥ कैएक पेरे जीराबक्तर कैएक पेरे पेटी ॥ ॥ लांभातेकी फौज सुन्नेकी अंगोठी ॥ " | घराण्याचा मूळ (वाघ) वाघांचेही घराणें पूर्वी फार मोठे होतें. ह्या पुरुष संताजीवाघ हा पाणिपतच्या लढाईत होळकराच्या सैन्यांतील एक प्रमुखवीर होता है इतिहास प्रसिद्ध आहेच. त्या घराण्याला बेटमे परगणा जहागीर होता. सांप्रत हैं घराणें अप्रसिद्ध श्राहे. [ पुढे चालू. ]