पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ ॥ कोणी मराठा कीरें लठ्ठ सोटा ॥ धरून मोठा, यवनास रहा || ॥ देउनि, जे मस्तक अत्तरानें ॥ सुंगधि तें फोडि पराक्रमानें ॥ ९० ॥ 66 हा काय युद्ध टिकणार लांडा" । ऐसें मुखे बोलत, उग्र खांडा ॥ ॥ कोणी मराठा खुपसी तयाचे ॥ छातीत तेणे क्षण तो न वांचे ॥९१॥ ॥ कीं मृत्युजिव्हा तरवार ऐशी ॥ कोणी मराठा उपसोनि रोषीं ॥ ॥ जो हिंदुनारींस अविंधहस्त || गांजी, तयातें उखडी समस्त ॥ ९२॥ ॥ स्वहस्त मांडीवर थाडथाड ॥ हणोनि, दंडाप्रत काडकाड || ॥ ठोकोनि कोणी यवनास कुस्ती । देऊनि त्याची हरि सर्व मस्ती । ९३ ॥ ॥ ऐसा रणी एकसहा सपाटा ॥ उडे, विराजे विजयी मराठा ॥ ॥ अविंधही कंबर बांधुनीयां ॥ झुंजेन मार्गे हटतां रणीं या ॥९४॥ ॥ काळणें कर्कश घोडियांचें ॥ ते नाद तैसे गजघटिकांचे ॥ ॥ हस्ती तसे उष्ट्र अनेक ह्यांचा ॥ 'ची, ची' असा शब्द कठोर साचा । ९५ । ॥ खणाखणी ती बहु आयुधांची ॥ ती युद्धवाद्यध्वनि थोर साची ॥ ॥ तो 'दीन, दीन' स्वर उच्च फार । तो शब्द तैसा 'हर, शंभु ' घोर। ९६॥ 1 ॥ हे शब्द एकत्र मिळोनि सर्व ॥ कल्लोळ अत्यंत असा अपूर्व ॥ ॥ उत्पादणारा भयकंप चित्तीं ॥ माजोनि जाऊाने जियें सभतीं ॥९७॥ ॥ युद्धांगणाभीतरि मध्यभागी || होऊनि गर्दी बहु जेथ जंगी ॥ ॥ अत्यंत ईर्षेस चढोनि वीर ।। रंगांत होते रण जेथ घोरे ।। ९८ ॥ ॥ जेथें सभोंतीं उडुनी धुराळा ।। तोंडाप्रती तोंड दिसे न डोळां ॥ ॥ जेथें मराठे अणि ते अविंध ।। होते बहू एक टोनि कुंद ॥९९॥ ॥ जेथें तदा येउनि अभ्र त्यांत || होऊनि भानू बहुवेळ लुप्त ।। ॥ काळोख तेणें पसरोनि अल्प ॥ येई जिथे घारे रणास रूप ॥ १०० ॥ ॥ मल्हारजीवीर तिथॆ प्रचंड ॥ ठोकोनि छाती दृढ, देउं तोंड ॥ ॥ राही उभा घेउनि थोरथोर ॥ जे जीव की प्राण असे खवीर ॥ १०१ ॥