पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ ॥ तोफा धडाडा किति गर्जतात ॥ ढगे धुराचीं जणु दाता ॥ ॥ गोळे विजेचे जणु लोळ त्यांत ॥ दिव्यप्रभे फार झळाळतात ॥ ७८ ॥ ॥ कृतांत दंडाकृति बंदुकांचे || झडोनियां फेर बहू भयाचे ॥ ॥ असंख्य गोळ्या मग फार तप्त || पर्जन्यबिंदूसम्म वर्षात ॥ ७९ ॥ | जे दारुचे बाण बहू भयाण ॥ तें क्रूर सपपरि सर्सरून ॥ ॥ विषापरी ओकत अभिधारा ॥ जाती रणीं वक्रगती सरारा ॥ ८० ॥ ॥ सुतारनाले किति हस्तनाले || ॥ ते रेकलेही किति ! गंजिफांचे ॥ जाल्यांचा रणि मार चाले ॥ होतात गाडे रणिं रिक्त साचे॥८१॥ ॥ होतात विच्छिन्न शिरे कुणांचीं ॥ वक्षः स्थळे भग्न तशी कुणांचीं ॥ ॥ वियुक्त होती कुणि हस्तपादीं | भाजून कोणी पडतात युद्धीं ॥ ८२ ॥ ॥ चाले धडाका रणिं ह्याप्रमाणें ॥ हो बाह्य कांहीं नर अश्क तेणें ॥ ॥ घोडे चहूंफेर पुढे सुवेगीं ॥ वाच्यापरी धांवति सर्वभागी ॥ ८३ ॥ ॥ मी मी ह्मणोनी लढणार मोठे || घोड्यांवरी स्वार असे मराठे | ॥ फेंकीत भल्लद्युति ह्या धुमींत ॥ सर्सावलेले जणु भासतात ॥ ८४ ॥ ॥ कीं सूर्य एकेक तदा प्रतापी ॥ अश्वावरी वैनेि उग्ररूपीं ॥ ॥ फेंकीत नाना किरण स्वकीय | आहे निघाला लढण्यास काय ॥ ८५ ॥ ॥ गतींत धोंड्यांवरि भूमधील || ह्या वाजिंचे होउनि घृष्ट नाल ॥ ॥ खणाणसे नित्य निनाद होत ॥ ज्या व्यक्त होती ठिणग्या रणांस ॥ ८६ ॥ ॥ त्या, वीर हे चालवुनी स्वभल्ल || स्वशत्रुचें नासिक, कर्ण, भाल ॥ ॥ छेदोनि, पाडोनि बहूत रक्त ॥ तेव्हांच तेणें करितात शांत ॥ ८७॥ युग्म ॥ ॥ ऐशा प्रतीचे रण होत होत ॥ योद्धे मराठे यवन प्रमत्त ॥ ॥ छातीस छाती भिडवोनि होतें ॥ झुंझावया नंतर लागले तें ॥ ८८ ॥ ॥ भासे तदा दोन ढगें अफाट ॥ की खेळती झुंज रणीं अचाट ॥ ॥ की हस्ति चे दोन समाज मस्त ॥ निर्धास्त कुस्ती करिती प्रशस्त ॥ ८९ ॥