पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८२४ | काव्य ३१ ॥ जो म्लेच्छ निर्धास्त पडून होता ॥ उटूंच त्यालागिं दिलें न आतां ॥ जो स्वस्थ होता बसला उठून ॥ उभेच राहू दिधलें तया न ॥ ६७ ॥ ॥ उभा असे त्याप्रत हात कांहीं ॥ घोड्यास लावू न दिला जराही ॥ ॥ जो स्वार घोड्यावरती तयाची ॥ चांदीच केली तिथल्या तिथेंची ॥ ६८ ॥ ॥ तेव्हां उडे गोंधळ काय थोर ॥ त्रेधा रिपूंची किति होय फार ॥ ॥ आंगांत आल्यापरि काय भूतें ॥ दाही दिशांला पळु लागले ते। ६९॥ ॥ सर्वत्र जेव्हां उघड्या शिरांनी ॥ ते दाटले फारच घाबरोनी ॥ ॥ तेव्हां गमे त्यास्थळ नारळीचें ॥ उप्तन्न झालें वन काय साचें ॥७०॥ ॥ मल्हारजीनें प्रखर स्वभल्लें ॥ कापोनि हेंही वन दाटलेलें ॥ ॥ दाढ्या जयां थोर अशा शिरांचा । कीं त्याक्षणीं व्युत्क्रम नारळांचा। ७१ । ॥ केला जणो ढीगच, बोकडांचीं ॥ कीं दाढियांनी युत मस्तकेंची ॥ ॥ अनेक कापोनि, विशाल साचीं ॥ राशी जणो की रचिली तयांची । ७२ ॥ ॥ युः ॥ ॥ वार्ता दयाबाहदराप्रती ही ॥ होतांच थोडी श्रुत शीघ्र तोही ॥ ॥ घेऊनियां सैन्य बलाढ्य थोर ॥ आला लढाया समरीं समोर ॥ ७३॥ ॥ मल्हारजीही लवलाहि त्यास ॥ सर्सावला टक्कर द्यावयास ॥ ॥ अविंध आणी मग ते मराठे ॥ हो ह्यांत तेव्हां रण* फार मोठे ॥ ७४॥ ॥ आहेत दोन्हीकडलेहि वीर ॥ सशस्त्र सज्ज स्थित युद्धशूर ॥ ॥ पेट्या जिरे बख्तर टोप ज्यांहीं ॥ आहेत केले धृत बद्ध देहीं ॥ ७५ ॥ ॥ घोड्यांवरी स्वार, तसे पदाती || असूनि योद्धे कुणि उष्टहस्ती ॥ ॥ भानुप्रभं शस्त्रसमूह सारा ॥ ज्यांचे करों फार चकाकणारा ॥ ७६ ॥ ॥ दिसून, अन्यत्रहि राहणारी ॥ असंख्य शस्त्रे तशि उग्र भारी ॥ ॥ आहेत मारीत बहू चकाकी ॥ चाले तदा झुंज अपूर्व लोकीं ॥ ७७॥ * अमझरा व धार यामध्ये तरळे खेड्याजवळ ही लढाई इ० स० १७३२ मध्ये झाली. मराठी बखरीत लिहिलें आहे की, मल्हारराव होळकरानें मोठा पराक्रम करून आपल्या हातानें दयाबहादराचा शिरच्छेद केला, दा.ऊ. टिळक ग्रंथस 16929 891·461