पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० ॥ वा कापर्णे म्लेंच्छ रणांत हेंच ॥ कीं माजलेले तृण कापणेंच ॥ ॥ गगोनि, खांडा करुनी विळाच ॥ ससविले जे असती खरेच।५५॥ ॥ ढोर्रे जणो म्लेंच्छच जे तयांचे || पाठीवरी ओति काठियांचे ॥ ॥ रट्टे, रणीं त्या वळवोनि, मागें ॥ आहेत जे संतत फार वेगें ॥ ५६ ॥ ॥ स्वदेशचें वैभव थोर हेंच ॥ शेतांतलें पोक अपार साच ॥ ॥ राखावयातें तरखार हीच ॥ करोनियां गोफण घोर साच ।। ५७ ॥ ॥ अविंध जे भासति भोरड्याच ॥ निवारुनी त्यां दिनरात्र साच ॥ ॥ आकाशांथों उडवोनि त्यांतें ॥ जे देत आहेत सदा स्वहस्तें ॥ ५८ ॥ ॥ ऐसे मराठे रणशूर वीर || विस्तोर्ण रेवा उतरोनि पार ॥ ॥ चडोनियां भैरवबाट गुत ॥ प्रवेशले सत्वर माळयांत ॥ ५९ ॥ ॥ तापे उन्हाळा अतितीत्र आतां ॥ तो मास तापप्रद चैत्र होता ॥ ॥ होतें असें ऊन तदा प्रचंड || बाहेर तें कार्टुन देइ तोंड ॥ ६० ॥ ॥ सर्वत्र आहे अशि सामसूम ती ॥ तो निर्जन प्रांत गमे सभोवती ॥ ॥ धूलीत जे श्वेतरजः कण स्थित ॥ आहेत तेजें कींध ते चकः कत। ६१॥ ॥ धरून थारा पशुपक्षि छायीं ॥ आहेत सारे स्थित टाइठायीं ॥ ॥ नभामधीं घारच मात्र एक ॥ घालीत आहे घिरट्या अनेक ॥ ६२ ॥ ॥ कदा कदा पंख विहंगमांवे ॥ निःशङ्खाणीत तदा तरूंचे ॥ ॥ हालून, जो शद्ब उठे हळूच ॥ ओढीत आहे स्थिर लक्ष तोच ॥ ६३ ॥ ॥ होते तिथें रक्षक जे अविध ॥ टाकोनि काने अपुली संबंध ॥ ॥ एकांतवासीं घुमुनी निवांत ॥ आहेत ते शर्बत थंड पीत ॥ ६४ ॥ ॥ वेळीं अशा होळकरप्रवीर ॥ ठाणीं रिपूंचीं बहु थोर थोर ॥ ॥ घेरी जणो पूर बहू विशाल ॥ ग्र. में निशीं काय तटावरील ॥ ६५ ॥ ॥ तेव्हां उडे जें घनचक्र त्यांत ॥ मल्हारजीनें यवन प्रमत्त ॥ ॥ उत्पाटिले देउनि त्यांस मोक्ष || प्रचंडवते जणु काय वृक्षं ॥ ६६ ॥