पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ ! त्या त्रस्तसंतापित ठाकुरांनीं ॥ योद्ध्या मराठ्यप्रत त्या ठिकाणीं ॥ ॥ आणावयाचें प्रमुखत्व त्यातें ॥ होतें दिलें ह्यासमयीं स्वचित्तें ॥ ४४ ॥ ॥ मल्हारजी होळकरासमीप || स्वदूत तो सांप्रत गुप्तरूप ॥ ॥ धाडुनि त्यातें कळवी “त्वरेनें ॥ या;साह्य आह्मी करुं निश्चयानें ॥४५॥ || ह्या नंदलाल मग घाटवाटा ॥ करोनियां मुक्त जणो कपाटां ॥ ॥ दिला मराठ्यांप्रत मार्ग अति ॥ रिघावया सत्वर माळव्यांत ॥ ४६ ॥ ॥ धिप्पाड भीमाकृति फार पुष्ट ॥ योद्धे मराठे मग हे बलिष्ट ॥ ॥ हे बीर ऐसे खुलती जयांचे ॥ वक्षः स्थळी घाय बहू रणींचे ॥ ४७ ॥ ॥ करोनियां धाडस शूरतेनें ॥ युद्धां रिपूंची हरिली निशाणें ॥ ॥ ह्मणोनि तोडे स्वपराक्रमाचे ॥ विराजती वामपदीं कुणांचे ॥ ४८ ॥ ॥ करूनि छाती, तुटुनी पडूनी ॥ तोफा रिपूंच्या जितल्या ह्मणूनी ॥ ॥ हस्तीं कुणांचे बहुमोल साचीं ॥ मोठीं कीं शोभति कांचनाचीं ॥ ४९॥ ॥ सेनापतींतें रिपुंच्या लडून || खेळून कुस्ती अणिलें धरून ॥ ॥ अमोल कंठ्या झगुनी कुणांच्या गळ्यांमधीं शोभति मोतियांच्या ॥५० ॥ जै स्वप्रतापार्जित तेंच देहीं || असूनियां भूषण, अन्य कांहीं ॥ ॥ नसून हे वीर बहूत साधे || जणो दुजे राघववीर योद्धे ॥ ५१ ॥ ॥ आहेत ज्यांच्या कटिं मांडचोळणे ॥ बंड्या तसे अंगरखे नवे जुने ॥ ॥ आहेत अगीं, तशि थोर धाकुटीं ॥ साधीं मराठीं शिरिं घट्ट पागुटीं ५२ ॥ ! ते काठियावाड सतेज गाजी ॥ जंघाल ते भीमथडी सुवाजी ॥ ॥ दुजेहि तैसे अतिवेगि नाना ॥ अहेत वारू बसग्य स ज्यांनां ॥५३॥ ॥ म्लेच्छ स्वदेशांतुनियां खणीनी ॥ जें काढणें तेंच जणो गणोनी ॥ ॥ स्वभूमिचें नांगरणें, निघाले || आहेत जे घेउनि उग्र भाले ॥ ५४ ॥

  • राव नंदलाल चौधरी इंदूर परगण्याचा जमीदार ह्मणजे मुख्य अधिकारी होता, त्याचे वंशज सध्यां इंदूरांत चांगल्या स्थितीत आहेत.