पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतका बसविला कीं त्यास तेथेंच आपलें काव्य पुरें करावें लागलें. “शितावरून भाताची परिक्षा" ह्या न्यायाने पुढील भाग जर झाले असते तर ते ह्या सारखेच चित्तवेधक झाले असते ह्यांत संशय नाहीं. आधीं अशीं चरित्रें स्वतः सिद्धच चित्तवेधक असतात. खरेंच ! मल्हारराव, अहल्याबाई, तुकोजीराव, अशा सारख्यांचीं चरित्रें कोणास चित्तवेधक होणार नाहींत ? पहिल्याचे अतुल शौर्य, दुसरीचा लोकोत्तर धार्मिकपणा व आचारसंपत्ति, तिसन्याची विलक्षण बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा इत्यादिकांचें वर्णन कोणास लुब्ध करणार नाहीं? त्यांतही एखाद्या कुशल कर्त्याचे हातून तीं झालीं तर बाचकांचे आदरास पात्र झाल्यावांचून रहाणार नाहींत. असो, ह्या पुस्तकास तरी पुष्कळ वाचक मिळोत व आपल्यांत मल्हाररावा सारखे जे वीर पुरुष होऊन गेले, त्यांजविषयींचा त्यांचा अभिमान जागृत राहो, ह्मणजे कर्त्याच्या श्रमाचे सार्थक झाले असें होईल. अण्णाजी पांडुरंग जोशी करकंबकर. प्रकाशक.