पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ ॥ विनी संतत हिंदुलोकां ।। ऐसा अनाचार अविंध ते कां ॥ ॥ संपूर्ण भाग करण्यास ऐसे ॥ प्रवृत्त झाले जरि दैत्यवेशे ॥२२॥ [[ कलापक ॥ ॥ “ हे अन्यधर्मांतिल हिंदु सर्व" ।। झगून ते म्लेंच्छ सदा सगर्व ॥ ॥ स्वराज्यनीतीमधिं पक्षपातें ॥ जाचूनि भारी इनुकें तें ॥२३॥ ॥ की सत्र धर्माचरणांवरीही ॥ द्वे करां बैसत्रुनी सदाही ॥ ॥ त्यांच्या शत्रींहीं कर ठेवण्यातें ॥ उद्युक्त झाले जरि दुष्टचित्तें ॥२४॥ ॥ युग्म ॥ संपूर्ण त्यांच्या तारे चितवृत्ति ॥ क्षोभून भारी जगु सिंधुमूर्ति ॥ ॥ संताप त्यांचा जगु नक्र काय ॥ तेव्हां न कां तो उसळून जाय? ॥२५॥ ॥ तदीय अंतःकरणा घरेंच ॥ तेव्हां न कां तो पडणार साच ? ॥ ॥ कां अंतरात्मा न जळेल त्यांचा? । कां प्राण कासाविस हो न सावा ? २६ ॥ ॥ कां म्लेच्छकंठास पिळून दाहूं ॥ कां घोंट घेऊं जबड्यांत कौं ? ॥ ॥ चिरून फाडून, करून चिंध्या । कां मोक्ष देऊं यवनांस सध्या ? २७ ॥ ॥ त्यांच्या मनाची स्थितेि ह्याप्रतीची ॥ अतः दुःसह्य असून साची ॥ ॥ सूड स्वतांचा उगवावयातें ॥ ते लोक सारे जुनीच होते ॥२८॥ ॥ संत्रस्त ठाकूर असे तिथून || दिल्लीपतीसन्निध ये उठून ॥ ॥ ह्या दुःखमुक्तीकरितां तयांनीं ॥ प्रार्थीयले त्यास तदा नमूनी ॥ २९ ॥ ॥ नाजूक दिल्लीपति ह्या घडीस ॥ घेऊनि नाना तरुणीजनांस ॥ ।। अंतर्गृहीं हास्यविनोदलीला || करीत होता बहु रंगलेला ॥३०॥ ॥ कांताभुजी बद्ध सदा असोनी ॥ हौशी असा हा यवनेश चैनी ॥ ॥ गानांत नृत्यांत असून गुंग ॥ होता विलासांमधिं फार दंग ॥३१॥